अल्पवयीन मुलीचा अत्याचार करून खून ; एलसीबीने संशयितास घेतले ताब्यात !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ४ ऑगस्ट २०२३ | भडगाव तालुक्यातील एका ७ वर्षीय अल्पवयीन मुलगी दोन दिवसापासून बेपत्ता झाली होती त्यानंतर तिचा मृतदेह एका ठिकाणी आढळून आल्याने जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ निर्माण झाल्याने पोलीस प्रशासन कामाला लागले होते त्यानंतर काही तासात पोलिसांनी संशयित आरोपीच्या मुसक्या आवळ्या आहेत. या नराधमाने अत्याचार करीत गोठ्यात मृतदेह टाकल्याचे घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी,अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख,यांनी सदरचा गुन्हा उघडकिस आणणे बाबत स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांना आदेश दिले होते. त्यावरुन स्थनिक गुन्हे शाखेचे सपोनि निलेश राजपुत, पोउपनिरी गणेश वाघमारे, गणेश चोभे, पोह विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, विजय पाटील, लक्ष्मण पाटील, प्रितम पाटील, महेश महाजन, अनिल जाधव, अकरम शेख, किशोर राठोड, ईश्वर पाटील, किरण चौधरी, हेमंत पाटील, हरिष परदेशी, महेश पाटील, रमेश जाधव, भारत पाटील, प्रमोद ठाकूर, दर्शन ढाकणे यांचे पथक तयार करण्यात आले होते. त्यावरून वर नमुद पथकाने शोध सुरु केला असता दिनांक १ ऑगस्ट २०२३ रोजी अल्पवयीन पिडीत मुलगी हिचे मृतदेह हे भडगाव पो.स्टे. हद्दीत आरोपीचे खळयातील कुट्टीचे डिगा जवळ चप्पल मिळून आली त्यावर कुट्टीचे ढिग उपसून पाहिला असता अल्पवयीन मुलीची प्रेत मिळून आले. त्यानंतर तपासात खळयाचे मालक याची व त्याचे कुटुंबाची चौकशी करीत असतांना खळयाचे मालकाचा मुलगा स्वप्नील उर्फ सोन्या पाटील, वय १९, ता. भडगाव जि. जळगाव याचेवर जास्त संशय बळावल्याने त्यास वरील पथकाने ताब्यात घेवून त्यास विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यास अधिक तपासकामी भडगाव पो.स्टे.चे ताब्यात दिले असून सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांचे मागर्दशनाखाली पो. निरी. श्री राजेद्र पाटील व त्यांचे पथक हे करीत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम