
रजनीकांतच्या घरातील मच्छरच्या बॅटने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष
दै. बातमीदार । १ नोव्हेबर २०२२ सिनेक्षेत्रात रजनीकांतने मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. नुकताच रजनीकांतचा ‘कांतारा’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. अभिनेता प्रभासपासून तर अभिनेत्री कंगना रणौतपर्यंत सगळ्यांनीच या चित्रपटाचे कौतुक केले आहे. हे कौतुक करण्यापासून साऊथचे सुपरस्टार रजनीकांतही मागे राहिले नाहीत.
रजनीकांतने सुद्धा या चित्रपटाचे खूप कौतुक केले. त्यानंतर आता कांतारा चित्रपटाचे दिग्दर्शक ऋषभ शेट्टी यांनी रजनिकांतच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. तसेच त्यांनी रजनीकांतच्या पाया पडून त्यांचा आशीर्वादही घेतला. या भेटीचे काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये रजनीकांत यांच्या घरी ऋषभ शेट्टी आणि रजनीकांत एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. मात्र, या फोटोतील रजनीकांत यांच्या घरातील एका वस्तूने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
ನೀವು ಒಂದ್ ಸಲ ಹೊಗಳಿದ್ರೆ.. ನೂರು ಸಲ ಹೊಗಳ್ದ೦ಗೆ ನಮಗೆ.❤️ಧನ್ಯವಾದಗಳು @rajinikanth sir ನಮ್ಮ ಕಾಂತಾರ ಚಿತ್ರ ನೋಡಿ ನೀವು ಮೆಚ್ಚಿದ್ದಕ್ಕೆ ನಾವು ಸದಾ ಆಭಾರಿ🙏🏼 #Kantara @VKiragandur @hombalefilms @gowda_sapthami @Karthik1423 pic.twitter.com/MNPSDR5jx8
— Rishab Shetty (@shetty_rishab) October 28, 2022
रजनीकांतच्या घरातील मच्छरच्या बॅटने नेटकऱ्यांना आकर्षित केलं आहे. फोटोंमध्ये मच्छराची बॅट पाहून लोकांनी मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘रजनी सरांनाही मच्छरच्या बॅटची गरज आहे हे पाहून बरं वाटलं. मला वाटलं, कदाचित मच्छर त्यांच्या घरात घुसण्याची हिंमत करणार नाहीत.’ दुसर्या एका यूजरने कमेंट केली की, ‘रजनीकांत सर मच्छराची बॅट वापरतात. मला वाटलं ती फक्त मध्यमवर्गीय कुटुंबातच वापरली जात असावी. तसेच यावेळी ऋषभ शेट्टी यांच्या गळ्यातील सोन्याच्या चेनवर देखील अनेकांनी कॉमेंट्स केल्या.
ही चेन रजनीकांतने ऋषभला दिली असल्याचा अंदाज चाहत्यांनी लावला आहे. एका यूजरने या फोटोंवर कमेंट केली की, ‘ऋषभ शेट्टीच्या गळ्यातील सोन्याची चेन पाहिली का? मला वाटतं रजनीकांत सरांनी ही चेन भेट दिली असावी. ही चेन काही फोटोंमध्ये दिसते तर काहींमध्ये दिसत नाही.’ याआधीही रजनीकांत यांनी ‘कांतारा’ या चित्रपटाचे जोरदार कौतुक केले होते. त्यांनी या चित्रपटाबद्दल ट्विट केले होते. “कांतारा पाहिल्यानंतर मला आनंद झाला. ऋषभ शेट्टी, लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून तुझ्या कामाला मी सलाम करतो. तसेच, मी चित्रपटात काम करणाऱ्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो,” असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम