राज्यात नव्या वादाला फुटले तोंड : छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ११ मार्च २०२३ । राज्यातील सत्ताधारी व विरोधाकामध्ये वेगवेगळ्या कारणावरून टीका टिपणी सुरु असतांनाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई लागलेल्या पोस्टवर चक्क छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना केल्या पुन्हा एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील आक्रमक झालेत. त्यांनी शिवरायांसोबत अशी तुलना करणे सोडा. त्यांच्या नखाचीही कुणाला सर येणार नाही, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खडेबोल सुनावलेत.

महाराष्ट्रात महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करण्यावरून अनेकदा राजकीय वातावरण पेटले. यापूर्वीचे वादग्रस्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात तर राजकीय पक्षांनी जोरदार आंदोलन केले. त्याची परिणीती त्यांच्या गच्छंतीमध्ये झाली. हे सारे प्रकरण शमते न शमते तोच हा नवा प्रकार आला आहे.

 

काय आहे दृश्य

मुंबईत शिवजयंतीनिमित्त ठिकठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत. त्यात एका पोस्टवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करण्यात आली आहे. शिवाय पोस्टरच्या वर 350 वर्षांनंतर…पुन्हा तोच योग! असे वाक्य ठळक अक्षरांत टाकले आहे. त्या पोस्टरवर दोन दृश्य रेखाटलेली आहेत. त्यात एका दृश्यात तुळजाभवानी माता छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देताना दाखवण्यात आली आहे. त्यात भवानी मातेच्या तोंडी एक वाक्य लिहिले आहे. त्यात म्हटले आहे की, हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ या भवानी तलवारीने कर.
पोस्टरवरच्या दुसऱ्या दृश्यात बाळासाहेब ठाकरे एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण देताना दाखवले आहेत. त्यात पाठिमागे आनंद दिघे यांचेही चित्र आहे. त्यावर एक वाक्यही आहे. त्यात बाळासाहेब ठाकरे म्हणतात, मला विश्वास आहे. आमचे प्रखर हिंदुत्वाचे विचार आणि भूमिका एकनाथा तूच पुढे नेऊ शकतोस. म्हणूनच श्रीरामाचे धनुष्यबाण तुझ्या हाती सुपूर्द करणे हा दैवी संकेतच आहे…यशस्वी भव!

राजू पाटलांचे उत्तर…
मुख्यमंत्र्यांच्या या पोस्टरबाजीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू शिंदे आक्रमक झालेत. त्यांनी या पोस्टरचा व्हिडिओ पोस्ट करून तिखट शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुनावले आहे. ते म्हणतात, कोणी स्वतःलाच ‘जाणता राजा’ म्हणवतं, तर कोणी ही अशी चित्रं काढून घेतं. अशा उपमांनी किंवा तुलनांनी कुणालाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नखाचीही सर येणार नाही. राजकीय स्वार्थासाठी शिवाजी महाराजांची तुलना करताना जनाची नाही तर मनाची तरी चाड ठेवा. शिवप्रभू एकमेव होते,आहेत आणि राहतील. त्यामुळे अतीउत्साही कार्यकर्त्यांना आवरा, असा सल्लाही त्यांनी एकनाथ शिंदे यांना दिला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम