आदित्य ठाकरेंच्या नावे नवा रेकॉर्ड : ‘यंग ग्लोबल लीडर्स’मध्ये नाव झळकले !
दै. बातमीदार । १५ मार्च २०२३ । राज्यातील शिंदे व ठाकरे वाद सुरु असतांना नेहमी शिंदे गट ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांच्या टीका करताना दिसून आला आहे. पण या टीकेला आदित्य ठाकरे तत्काळ प्रतिउत्तर न देता शांत व संयमाने शिंदे गटाला उत्तर देण्यात नेहमी अग्रेसर असतात. आता आदित्य ठाकरे यांच्या नावे नवा रेकॉर्ड झाला आहे. ‘द वर्ल्ड इकॉनॉमिक पह्रम’ने 2023च्या ‘यंग ग्लोबल लीडर्स’ची नावे आज जाहीर केली. या यादीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा समावेश झाला आहे. महाराष्ट्रातील आश्वासक युवा नेतृत्व आदित्य ठाकरे यांनी जागतिक स्तरावर झेप घेतली आहे. याबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
यंदा वर्ल्ड इकॉनॉमिक पह्रमने ‘यंग ग्लोबल लीडर्स क्लास’मध्ये 40 वर्षे वयाखालील सुमारे 100 जणांची निवड केली आहे. समाजात, देशात किंवा जगभरात सकारात्मक आणि चिरस्थायी बदलासाठी कार्य करणारे राजकीय नेते, कल्पक उद्योजक, क्रांतिकारी संशोधक, दूरदर्शी कार्यकर्ते अशांचा यादीत समावेश केला आहे. यादीत वेगवेगळ्या गटांतून सहा हिंदुस्थानींची निवड झाली आहे.
‘पब्लिक फिगर’मध्ये आदित्य ठाकरे, भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मधुकेश्वर देसाई यांचा समावेश आहे. उद्योग गटात जिओ हॅप्टिक टेक्नॉलॉजीचे सहसंस्थापक आकृत वैश, टीव्हीएस मोटरचे व्यवस्थापकीय संचालक सुदर्शन वेणू, बायोझीन इंडियाचे कार्यकारी संचालक विबीन बी. जोसेफ, थिंक टँक गटात तन्वी रत्ना यांचे नाव आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक पह्रम ही संस्था 2004 साली स्थापन झाली आहे. जगभरातील प्रमुख समस्यांचे निराकरण करण्यासाठी ही फर्म काम करते. त्यासाठी सर्वोत्कृष्ट लोकांचा वैविध्यपूर्ण समूह तयार करण्यात आला आहे. यामध्ये 120 हून अधिक देशांतील 1400 सदस्य आणि माजी विद्यार्थी यांचा समावेश आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम