आयफोन वापरकर्त्यांना धक्का ; हे मॉडेल होणार बंद !
दै. बातमीदार । २९ मे २०२३ । अनेक कंपनीकडून वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईल दरवर्षी लौन्च केले जात असतात. अशातच काही दिवसात Apple कंपनीकडून iPhone 15 लॉन्च करण्याची तयारी सुरू आहे. पण त्याचवेळी Apple ने आपला तीन वर्षे जुना आयफोनही बंद केला आहे. अशा परिस्थितीत Apple कडून iPhone 15 लाँच केल्याने तीन वर्षे जुना iPhone 12 बंद होऊ शकतो. तर iPhone 13 आणि iPhone 14 सारख्या इतर आयफोनच्या किंमतीत कपात केली जाऊ शकते.
अशा परिस्थितीत, जर तुम्ही आता iPhone 12 खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक मोठी संधी आली आहे. कारण Apple Store वर iPhone 12 बंद करण्यात आला आहे. परंतु हे कंपनीच्या अधिकृत भागीदार स्टोअरमधून खरेदी केले जाऊ शकते, जेथे iPhone 12 चा मर्यादित स्टॉक शिल्लक आहे जो विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. Apple ने iPhone 12 चे उत्पादन आधीच बंद केले असले तरी परंतु सध्या iPhone 12 काही रिफर्बिस्ड स्टोअर्स आणि निवडक डीलर स्टोअर्सवर उपलब्ध आहे.
सध्या Apple आपल्या स्टोअरमधून iPhone SE 2022, iPhone 12, iPhone 13 mini, iPhone 13, iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone Pro आणि iPhone Pro Max विकत आहे. याशिवाय कंपनी iPhone 14 मॉडेलचे उत्पादन करत नाही. त्याच iPhone 12 Mini आणि iPhone 13 Mini सुद्धा फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत.
याशिवाय, Apple कंपनीकडून iPhone 15 लाँच केल्याने, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max देखील बंद केले जाऊ शकतात, कारण Apple गेल्या काही वर्षांपासून एक वर्ष जुने Pro आणि Pro Max बंद करत आहे. यासोबतच iPhone 13 Mini आणि iPhone 14 Plus देखील बंद केले जाऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला आयफोनचे जुने मॉडेल्स घ्यायचे असतील तर पटकन रिटेल स्टोअरमध्ये जाऊन ते खरेदी करा.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम