ठाकरे गटाला धक्का ; संजय राऊत यांचे निकटवर्तीय शिंदे गटात दाखल !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २२ डिसेंबर २०२२ । खासदार संजय राऊत यांचे नाशिकमधील निकटवर्तीय मानले जाणारे भाऊसाहेब चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे नाशिकचे संपर्कप्रमुख असलेल्या भाऊसाहेब चौधरी यांची पक्षातून उचलबांगडी केल्याची माहिती संजय राऊत यांनी ट्विट कली आहे. दरम्यान आता भाऊसाहेब चौधरी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे.

“शिवसेना नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांची शिवसेना तसेच संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात येत आहे.शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात येत आहे.” असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

 

नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटाला यापूर्वी देखील धक्के बसले आहेत. काही दिवसांपूर्वी १२ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर नाशिकच्या संपर्कप्रमुख जबाबदारी भाऊसाहेब चौधरी यांच्या कडे होती. तसेच चौधरी हे संजय राऊत यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जातात.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम