ठाकरे गटाला धक्का ; शिंदेंना मिळाले धनुष्यबाणासह शिवसेना !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १८ फेब्रुवारी २०२३ । अवघ्या देशाचे लक्ष असलेला निकाल जाहीर झाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगात गेल्या अनेक महिन्यांपासून प्रकरणावर युक्तिवाद सुरु होता. अखेर या प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वात मोठा निर्णय जाहीर केलाय. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला शिवसेना आणि धनुष्यबाण दिला आहे. ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाने राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. निवडणूक आयोगाने निकालामध्ये एकनाथ शिंदे यांना शिवसेना नाव आणि चिन्ह म्हणून धनुष्यबाण मिळणार असल्याचं सांगितलं आहे. ठाकरे गटाला आता एक नवीन सुरुवात करावी लागणार आहे.

एकनाथ शिंदे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मिळून सत्तांतर घडवून आणलं होतं. या घडामोडींनंतर ठाकरे गट केंद्रीय निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात गेला होता. गेल्या आठ महिन्यांपासून याबाबत सुनावणी सुरु होती. निवडणूक आयोगात याबाबतचा युक्तिवाद पूर्ण झालेला होता. त्यानंतर कधीही निकाल येणं अपेक्षित होतं. त्यानुसार आज संध्याकाळी निवडणूक आयोगाकडून निकाल जाहीर करण्यात आलाय. या निकालामुळे ठाकरे गटाला खूप मोठा झटका मिळाल्याचं मानलं जातंय. या राजकीय घटनेवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम