नव्या वर्षात नाशिकमध्ये कंपनीला भीषण आग ; कामगार जखमी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १ जानेवारी २०२३ देशात नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत होत असतानाच राज्यातील नाशिक शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या मुंढेगाव एमआयडीसीतील जिंदाल कंपनीत रविवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. बॉयलरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याचे समोर आले आहे. स्फोटानंतर आकाशात धुराचे व आगीचे लोट उठत असल्याचे दूरवरूनही पाहायला मिळत होते. आगी एवढी जास्त होती की, धूर सर्वत्र पसरला होता. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल व पोलिस अधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी त्या ठिकाणी तातडीने धाव घेतली.

या आगीमध्ये 25 ते 30 कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात या कर्मचाऱ्यावर दोन कक्ष राखीव ठेवण्यात आलेले आहे. औद्योगिक वसाहती नियमितपणे कामकाज सुरू असताना अचानकपणे सकाळी 11 वाजेच्या सुमारास ही आग लागली. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की, आजूबाजूच्या घरातील खिडक्यादेखील हादरल्या. या घटनेमुळे आजूबाजूच्या भागातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अचानक लागलेल्या या आगीमुळे काही कामगार गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान या आगेची घटना समजतात अग्निशामक दलाचे बंब, वाडीव्हरे पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी धाव घेत बचावकार्यास सुरुवात केली आहे.

नाशिक मुंबई महामार्गावर असलेल्या गोंदे गावाजवळ जिंदाल कंपनीचा प्लांट आहे. या प्लांटमध्ये आज बॉयलरचा मोठा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की आजूबाजूच्या 20 ते 25 गावांमध्ये आवाज ऐकू आला. कंपनीत साधारण 2000 कर्मचारी कामाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. स्फोटाच्या घटनेत काही कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अद्यापही सविस्तर माहिती मिळाली नाही.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम