मनमाड-जळगाव रेल्वेमार्गावर दोन दिवसाचा मेगाब्लॉक !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ११ ऑगस्ट २०२३ | तिसरी रेल्वे लाइन आणि दुहेरी मार्गाचे काम केले जाणार असल्याने मनमाड-जळगाव रेल्वेमार्गावर या मार्गावर सोमवार (ता. १४) ते मंगळवार (ता. १५) असा दोन दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

त्यामुळे या मार्गावरील काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या वळवण्यात आल्या असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.डाउनच्या पुढीलप्रमाणे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत: देवळाली-भुसावळ एक्स्प्रेस, मुंबई साईनगर शिर्डी वंदे भारत ट्रेन (ता. १४), मुंबई-नांदेड एक्स्प्रेस, इगतपुरी-भुसावळ एक्स्प्रेस, मुंबई-जालना एक्स्प्रेस, पुणे-जबलपूर एक्स्प्रेस (ता. १४), दादर बलिया एक्स्प्रेस (ता. १२), मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस, मुंबई-आदिलाबाद एक्स्प्रेस (ता. १३/१४), पुणे-नागपूर एक्स्प्रेस (ता. १४), रिवा एक्स्प्रेस (ता. १५), पुणे-नागपूर एक्स्प्रेस (ता. १५), नांदेड एक्स्प्रेस, सिकंदराबाद एक्स्प्रेस, कोल्हापूर गोंदिया ट्रेन, लोकमान्य टिळक टर्मिनल-नांदेड एक्स्प्रेस.

अपच्या रद्द करण्यात आलेल्या गाड्या अशा : भुसावळ-देवळाली एक्स्प्रेस (ता. १३/१४), वाबडे भारत ट्रेन (ता. १४), नांदेड-मुंबई एक्स्प्रेस (ता. १३/१४), भुसावळ-इगतपुरी (ता. १४), जालना-मुंबई एक्स्प्रेस, जबलपूर-पुणे एक्स्प्रेस (ता. १४), बलिया-दादर एक्स्प्रेस (ता. १३/१६), नागपूर- मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस (ता. १३/१४), आदिलाबाद-मुंबई एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेस (ता. १३), पनवेल एक्स्प्रेस (ता. १४), नागपूर-पुणे एक्स्प्रेस (ता. १४), मुंबई-नांदेड एक्स्प्रेस, सिकंदराबाद-मुंबई एक्स्प्रेस (ता. १३/१४), गोंदिया-कोल्हापूर ट्रेन (ता. १४/१६), नांदेड-लोकमान्य टिळक टर्मिनल एक्स्प्रेस (ता. १४)

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम