पत्नी प्रियकरासोबत सापडली अशा अवस्थेत ; व्हिडीओ व्हायरल !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ३० जुलै २०२३ | प्रत्येक धर्मात लग्न करणे म्हणजे दोन परिवाराचे एकत्र येणे असते. लग्नानंतर नवरा बायकोमधील प्रेम, विश्वास, आदर, सन्मान आणि काळजीने हे नातं खुलत जातं. पण जेव्हा या प्रेमात तिसरा व्यक्ती येतो तेव्हा क्षणात त्या नात्याला तडा जातो. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारमधील या घटनेच्या व्हिडीओने सगळ्यांचे हौश उडाले आहेत. मोतिहारी गावातील एका विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी आलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी लाठीने बेदम मारहाण केली. एवढंच नाही तर महिलेलाही गावामध्ये काठीने तुडवण्यात आलं.

विवाहित महिलेने आपल्या प्रियकराला घरी भेटण्यासाठी बोलवलं होतं. तेव्हा ते दोघं आक्षेपार्ह अवस्थेत असताना अचानक पती घरी आला. त्या पत्नीला अशा अवस्थेत पाहून संतापला आणि त्याने काठी उचलून दोघांना मारहाण करण्यास सुरु केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्विटरवर NCMIndia Council For Men Affairs या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये पती पत्नी आणि तिच्या प्रियकराला काठीने मारताना दिसत आहे. काही ग्रामस्थही दोघांवर लाठ्यांचा वर्षाव करताना दिसून येतं आहे. दुसरीकडे त्या महिलेचे मुलं आईला वाचविण्यासाठी गयावया करताना दिसत आहेत.

 

धक्कादायक म्हणजे व्हिडीओमध्ये प्रियकर आणि विवाहित महिलाही एकमेकांना मारताना दिसत आहे. वेदनेने आक्रोश करणारी महिला रडताना दिसत आहे. एवढंच नाही तर या मारहाणीनंतर त्या दोघांना शिक्षा म्हणून गावकऱ्यांसमोर मुंडणही करण्यात येण्याचं जाहीर केलंय. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या विवाहित महिलेचे त्यांच्या गावात राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत 6 महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. गावकऱ्यांना त्यांच्यावर आधीपासूनच संशय होता. मात्र नवऱ्याने त्यांना रंगेहाथ पकडल्यानंतर त्यांनी या दोघांना काठीने मारहाण केली. पती त्या दोघांना मारत असताना घटनास्थळी दाखल झाले आणि पतीला त्यांनी ताब्यात घेतलं.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम