केदारनाथ धामच्या गर्भगृहात महिलेने उडविल्या नोटा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १९ जून २०२३ ।  देशातील अनेक भाविक उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिरात दर्शन घेण्यासाठी जात असतात. अशातच एका महिलेने या मंदिरात नोटा उडवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. साधारण 8 सेकंदाच्या व्हिडिओ क्लिपमध्ये कथितरित्या एक महिला उत्तराखंडमधील केदारनाथ धामच्या गर्भगृहात रोख रक्कम उडवताना दिसत आहे.

 

यावेळी तेथे उपस्थित असलेले इतर भाविक प्रार्थना करत असलेलेही दिसत आहे. मंदिराच्या गर्भगृहातून सोने चोरीला गेल्याचे वृत्त आल्यानंतर काही दिवसांनी हा व्हिडिओ समोर आला आहे. कथित व्हिडिओमध्ये पांढरी साडी नेसलेली महिला मंदिराच्या गर्भगृहातील शिवलिंगावर नोटा फेकताना दिसत आहे. महत्वाचे म्हणजे तिथे उपस्थित असलेला पुजारीही महिलेला अडवताना किंवा याबाबत काही कारवाई करताना दिसत नाही. ही घटना उघडकीस आल्यानंतर बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीच्या (बीकेटीसी) अध्यक्षांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम