बागेश्वर धाममध्ये तरुण घुसला पिस्तुल घेऊन !

बातमी शेअर करा...

देशात गेल्या सहा महिन्यापासून नियमित चर्चेत असलेले बागेश्वर धामचे महंत धीरेंद्र शास्त्री हे आपला दरबार मध्यप्रदेशमधील छतपूर येथे घेत असतात याच बागेश्वर धाममध्ये एक तरुण पिस्तुल घेऊन घुसला. हा तरुण हातात पिस्तुल घेऊन परिक्रमा मार्गावर फिरत होता.

या शस्त्रधारी तरुणाला पाहून लोकांमध्ये दहशत पसरली, चांगलीच धावपळ उडाली. तिथे उपस्थित असलेल्या भाविकांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलील घटनास्थळी दाखल झाले. या तरुणाला अटक करण्यात आली आहे. चौकशी सुरू घटनेबाबत अधिक माहिती अशी की, एक तरुण हातात खुलेआम पिस्तूल घेऊन बागेश्वर धाममध्ये घुसला. हा तरुण हातात पिस्तुल घेऊन परिक्रमा मार्गावर फिरत होता. या तरुणाला पाहून भाविकांमध्ये खळबळ उडाली. तिथे उपस्थित असलेल्या काही जणांनी याची माहिती पोलिसांनी दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या तरुणाला ताब्यात घेतलं. हा तरुण कोण आहे, त्याच्याकडे पिस्तुल कसं आलं तो बागेश्वर धाममध्ये कसा घुसला याची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर हा तरुण हातात पिस्तुल घेऊन थेट बागेश्वर धाममध्ये घुसल्यानं सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. हा तरुण हातात पिस्तुल घेऊन खुलेआमपणे परिक्रमा मार्गावर फिरत होता. तिथे उपस्थित असलेल्या भाविकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. पोलिसांकडून आता या तरुणाची चौकशी सुरू आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम