राज्यातील हजारो शिक्षकांचे आधार कार्ड अपात्र !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २९ एप्रिल २०२३ ।  महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद (मुंबई) यांनी नुकतीच राज्यातील अपात्र शिक्षकांची माहिती जाहीर केली आहे. राज्यातील शाळा, विद्यार्थी व शिक्षकांची माहिती ‘यू डायस प्लस’मध्ये ऑनलाइन भरणे बंधनकारक केले आहे. या प्रक्रियेत राज्यात जवळपास 12 हजार 653 शिक्षकांचे आधार कार्ड अपात्र असल्याचे समोर आले आहे.

सातारा जिह्यात 255 शिक्षकांचे आधार कार्ड अपात्र असल्याचा अहवाल देण्यात आला आहे. राज्यातील शाळा, किद्यार्थी व शिक्षकांची माहिती ‘यू डायस प्लस’मध्ये ऑनलाइन भरणे बंधनकारक असून, केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयाच्या वतीने राज्याच्या शिक्षण विभागाला ही माहिती भरणे सक्तीचे केले आहे. त्यानुसार राज्यातील विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड या प्रणालीत अपडेट करण्याच्या वारंवार सूचना शिक्षण किभागाने दिल्या आहेत. मात्र, अद्यापि विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट झाले नाही. या प्रक्रियेत आधार कार्ड अपडेटकरच 2022-23ची संचमान्यता निश्चित करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आधार कार्ड क्हॅलिड (पात्र) करण्यासाठी शिक्षकांची धावपळ सुरू असल्याचे दिसून येत आहे.

सातारा जिह्यातील विद्यार्थ्यांची आधार कार्ड प्रक्रिया मागील दीड वर्षात आता कुठे 98 टक्के झाली आहे. एकीकडे विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करण्यात शिक्षक गुंतले असतानाच त्यांचे स्वतःचेच आधार इनक्हॅलिड असल्याची माहिती समोर आल्याने आश्चर्य क्यक्त केले जात आहे. जिह्यात सद्यःस्थितीत सुमारे 19 हजार शिक्षक आहेत. यामधील 255 शिक्षकांचे आधार अपात्र असल्याचे समोर आले आहे. यू डायस प्लस प्रणालीकर शिक्षकांचे आधार कार्ड अपात्र असल्याने या शिक्षकांना बोगस शिक्षक मानण्यात आले आहे. तशी जिल्हानिहाय यादी महाराष्ट्र शिक्षण प्राथमिक शिक्षण परिषद (मुंबई) यांनी प्रसिद्ध केली आहे. दरम्यान, या शिक्षकांचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी 30 एप्रिलची मुदत दिली आहे. या मुदतीत माहिती पूर्ण करून न घेतल्यास त्याची जबाबदारी गटशिक्षणाधिकाऱयांकर असल्याचे शिक्षण परिषदेने काढलेल्या पत्रात म्हटले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम