
पारोळा (प्रतिनिधी) माननीय सर्वोच्च न्यायालयाने सरकार ला लवकरात लवकर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याच अनुषंगाने सन २०२५-२६ मध्ये होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पारोळा तालुक्यातील सर्व राजकीय पक्षाचे प्रमुख व पदाधिकारी यांची बैठक दि 21 मे रोजी तहसील कार्यालय पारोळा येथे तहसीलदार डॉ उल्हास देवरे यांनी आयोजित केली होती.
सदर बैठकीत उपस्थित सर्व राजकीय पदाधिकारी यांना नवीन मतदार नोंदणी करणे, बूथ लेव्हल एजंट यांची नियुक्ती करणे, मतदार यादी प्रसिद्ध झालेवर आपले व कुटुंबातील सदस्य यांचे नाव समाविष्ट आहेत याची खातरजमा करणे, मयत मतदारांची नावे कमी करणे, लग्न होऊन सासरी गेलेल्या व लग्न होवून आलेल्या महिलांचे नाव रीतसर कमी/ वाढवणे, आपल्या रहिवासी भागाचे मतदान केंद्र माहिती करून घेणे याबाबत माहिती देण्यात आली.
यावेळी तालुक्यातील विविध पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते, त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्न बाबत चर्चा करण्यात येऊन बैठक संपन्न झाली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम