महाराष्ट्रात पीक विम्याची रक्कम मिळविण्यात अमळनेर तालुका आघाडीवर-आ.अनिल पाटील.. लोणचारम तांडा येथे विकास कामांचे थाटात भूमीपूजन..
अमळनेर(आबिद शेख)संपूर्ण महाराष्ट्रात पिकविम्याची सर्वाधिक रक्कम अमळनेर तालुक्यालाच प्राप्त झाली असून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात 500 कोटी रुपये प्रथमच जमा झाले आहेत,संजय गांधी निराधार योजनेचे सर्वाधिक जास्त प्रकरणे आपल्या तालुक्यातच मंजूर झाले आहेत,आपल्या लोकांना न्याय मिळवून देण्याच्या व्हिजन मुळेच हे शक्य झाले असल्याची भावना आ.अनिल भाईदास पाटील यांनी लोणचारम तांडा येथे आयोजित विकास कामांच्या भूमीपूजन सोहळ्याप्रसंगी व्यक्त केली.
अमळनेर तालुक्यातील लोणचारम तांडा येथे आमदारांच्याच प्रयत्नाने मंजुर झालेल्या डि.पी.सी. अंतर्गत स्मशानभूमी बांधणे( रक्कम 10.00 लक्ष) आणि जलजीवन मिशन अंतर्गत गावात पाणीपुरवठा करणे (रक्कम 31.72 लक्ष.) या कामांचे भूमीपूजन आ.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यानिमित्ताने गावात सत्कार सोहळाही आयोजित करण्यात आला होता,ग्रामस्थांनी आमदारांचे जल्लोषात स्वागत करून जंगी सत्कार केला.पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले की येणाऱ्या काळात लोण पंचक्रोशीतील पाण्याचा प्रश्न 100 % सुटणार आहे.लोण-भरवस रस्ता करणे अत्यावश्यक असून त्याची मंजुरी देखील आपण लवकरच मिळविणार आहोत,लोण पंचक्रोशीतील सर्व गावांनी माझ्यावर आज पर्यंत भरभरून प्रेम केल असून तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मागच्या 3 वर्षा मध्ये मतदारसंघात खूप विकास कामे झाली आहेत, आणि तुम्ही भूमिपुत्र निवडून दिल्याने गेल्या 5 वर्षापूर्वी विकाऊ म्हणून जो डाग लागला होता तो देखील पुसून गेला आहे,मतदारसंघात अजून जी कामे महाविकास आघाडीने मंजूर केली होती त्या कामांना आताच्या सरकारने स्थगिती दिली,मात्र आपले व्हिजन चांगले असल्याने तोही निधी नक्कीच मिळेल अशी ग्वाही आमदारांनी दिली.
यावेळी एस टी कामगार नेते एल टी नाना पाटील,सौ.मंदाकिणी पाटील (तालुकाध्यक्षा- राष्ट्रवादी महिला काँग्रेस), सीमा विवेक पाटील (सरपंच व जळगांव जि.महिला काँग्रेस सरचिटणीस), दिपक पाटील (उपसरपंच), संभाजी लोटन पाटील (संचालक बाजार समिती), रामराव पाटील (भरवस), सुनिल पाटील (उपसरपंच लोणसिम), एन टी पाटील (चेअरमन- लोणगृप वि.का.सोसायटी), दिपक पाटील (वावडे), काशीनाथ पाटील माजी सरपंच) दिपक पाटील, महेंद्र पाटील, संदिप पाटील, सुरेश बापु पाटील (माजी उपसरपंच), सतिश पाटील, मधुकर पाटील, मनिष पाटील, शुभम पाटील, अधिकार पाटील, भटु पाटील, संजय थोरात, युवराज पाटील, योगेश पाटील, देविदास पाटील, समाधान बेहेरे, रविंद्र वैद्य, संभाजी पवार, धोंडु राठोड, सुनिल राठोड, संभाजी राठोड, शरद पाटील, संजय राठोड, भिका राठोड, चुडामण पाटील, दिपक पाटील, वसंत मनोहर पाटील, रावण पाटील, मालोजी पाटील, बाबाजी पाटील, बन्सीलाल पाटील, दिलीप पाटील, माजी सरपंच प्रदिप पाटील, राजेंद्र पाटील, विशाल पाटील, अनिल पाटील, विवेक पाटील (ग्रा.पं.सदस्य), भगवान पाटील, गणेश पाटील (लोणसिम), दिपक सर, गणेश पाटील, सुशील पाटील यांच्या सह ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम