अंतुर्ली रंजाणेत आमदार अनिल पाटलांच्या प्रयत्नातून प्रथमच मिळाला भरघोस निधी… तब्बल 2 कोटींच्या विकासकामांचा आमदारांच्या हस्ते शुभारंभ
अमळनेर(आबिदशेख)तालुक्यातील अंतुर्ली रंजाणे गावात विकास कामांसाठी तब्बल 20, 00लक्ष च्या निधीची बरसात आमदार अनिल भाईदास पाटील यांनी केली असून या गावांना प्रथमंच एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाला आहे.
आमदार अनिल पाटील यांच्या स्थानिक आमदार निधीतून सुमारे 35 लक्ष किमतीच्या सभामंडपाचे भूमिपूजन आमदारांच्या शुभहस्ते नुकतेच करण्यात आले.रंजाने येथे आमदारांचे ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत करून सत्कार केला,यावेळी आमदारांनी बोरी काठच्या सर्वच गावांचे आपल्यावर विशेष प्रेम असल्याने माझेही प्रेम येथील गावांवर असून परिसरातील गावांसाठी जास्तीतजास्त निधी देत राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.रंजाने येथे भूमीपूजन प्रसंगी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील, कार्याध्यक्ष प्रा सुरेश पाटील, शिवाजीराव पाटील, बाजार समितीचे संचालक एल.टी.पाटील, मा.नगरसेवक दिपक पाटील, गणेश वेडू पाटील धार, रामकृष्ण पाटील तलवाडे, अशोक पाटील लोण, हिम्मत पाटील निंभोरा, प्रथम लोकनियुक्त सरपंच अंतूर्ली-रंजाणे सौ.शितल सचिन पाटील, उपसरपंच शिवाजी रामराव पाटील सदस्य सेवकराम धुडकू पाटील, छोटू नीलकंठ पाटील, सदस्य कमलबाई लक्ष्मण भिल, आशा सुभाष जगताप, प्रतिभा विलास पाटील, विद्यमान सदस्य संजय सैदाणे, बापू ठाकूर, सीमा भरत पाटील, हर्षदा भटू पाटील, मा.वि.सो.चेअरमन सुभाष पोपट पाटील, बाबुराव राघो पाटील, रवींद्र ठाकूर, नाना पाटील, अमर गरुड, किशोर पाटील, सुभाष जगदेव, लोटन पाटील, संजय सत्तम, विनायक गिरधर पाटील, बापू नवल पाटील, नाना भिल, महेश पाटील, भुवन पाटील, गोरख पाटील, संजय नवल पाटील, पद्माकर हिरालाल पाटील, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत पाटील , सुरेश पाटील, राजू सर यांनी केले,यावेळी सर्व अंतुर्ली-रंजाने ग्रामस्थ उपस्थित होते.
दोन्ही गावात या कामांचा झाला शुभारंभ
1) जलजीवन मिशन अंतर्गत रक्कम रु. 52 लक्ष
2) राष्ट्रीय पेयजल योजने अंतर्गत रक्कम रु. 29 लक्ष
3) आदिवासी वस्तीत अंतुर्ली येथे देव मढी बांधणे रक्कम रु. 7 लक्ष
4) जिल्हा परिषद शाळेला वॉलकंपाउंड करणे, रक्कम रु. 14 लक्ष
5)अंतुर्ली ते धार रस्ता डांबरीकरण करणे, रक्कम रु.20 लक्ष
6) जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती करणे, रक्कम रु. 3 लक्ष
7) स्थानिक आमदार निधी अंतर्गत रंजाने येथे सभामंडप बांधणे, रक्कम रु.35 लक्ष
8) जिल्हा परिषद अंतर्गत सौरक्षण भिंत बांधणे, रक्कम रु.5 लक्ष
9) अंतुर्ली ते रंजाने दलित वस्ती साठी रक्कम रु. 20 लक्ष
10) प्रस्तावित कार्तिक स्वामी मंदिरा साठी सभामंडप बांधणे रक्कम, रु. 15 लक्ष
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम