आ.गोपीचंद पडळकर यांचा अमळनेरात निषेध.. राजमुद्रा फाउंडेशन व नगरसेवक शाम पाटील यांच्याकडून पडळकर यांच्यावर पलटवार…
अमळनेर(आबिद शेख)
तरुणांचे आदर्श व युवा नेते आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केल्याप्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर यांचा अमळनेरात राजमुद्रा फाउंडेशनचे अध्यक्ष शाम पाटील यांनी पत्रकाद्वारे निषेध करत पलटवार केला आहे.
महाराष्ट्रात महापुरुषांची सुरू असलेली बदनामी तसेच वारंवार चुकीचा इतिहास पसरविण्याचा काही लोकांकडून प्रयत्न होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांच्याकडून नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात महापुरुषांच्या जीवनावर आधारित पुस्तकांचा संच तसेच सध्याच्या घडीला तणावग्रस्त असलेला महाराष्ट्र – कर्नाटक सीमावादाचा मुद्दा यावर आधारित संघर्ष हे पुस्तक आमदार तसेच मंत्री यांना देण्यात येत आहे.
यावर आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांवर खालच्या शब्दात टीका करतांना बिनडोक असा उल्लेख केला तसेच पवारांच्या घराणेशाहीवर देखील त्यांनी भाष्य केले.
या टीकेला अमळनेरातील राजमुद्रा फाउंडेशनचे अध्यक्ष तथा नगरसेवक शाम पाटील यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांनाच बिनडोक म्हणत एक प्रसिध्दीपत्रक जाहीर केले आहे. यात म्हटले आहे की गोपीचंद पडळकर हा स्वतः बुद्धीहीन माणूस असून विकासाचा व या माणसाचा काहीही संबध नाही. दोन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी तसेच समाजातील तरुणांना नादी लावण्याच काम पडळकर करतात. स्वतःच्या आईला ग्रामपंचायत निवडणुकीत उभे केले तेव्हा पडळकरांना घराणेशाही दिसली नाही का..? असा प्रश्न देखील यावेळी शाम पाटील यांनी उपस्थित केला आहे…!
पवार घराण्याने तसेच आमदार रोहित पवारांनी स्व-कर्तृत्वाने आज राज्यात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. बारामती ऍग्रोच्या माध्यमातून शेतकरी तसेच तरुणांना दिशा देण्याच काम त्यांनी केलेल आहे. रोहित पवारांवरील केलेल्या टीकेचा निषेध करत शाम पाटील यांनी पडळकर हेच स्वतः बिनडोक असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे…!
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम