आमिरचा मुलीच्या साखरपुड्यातील डान्स झाला व्हायरल !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २० नोव्हेबर २०२२ 57 वर्षीय आमिरने पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पायजमा परिधान केला होता. वाढलेल्या पांढऱ्या दाढी-मिशीतील त्याचा हा वेगळा लूक पाहून अनेकांनी आश्चर्यसुद्धा व्यक्त केला. अभिनेता आमिर खानच्या कुटुंबात सध्या आनंदाचं आणि जल्लोषाचं वातावरण आहे. कारण त्याची लाडकी लेक आयरा खान हिचा नुकताच साखरपुडा पार पडला.

बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत आयरा लग्नबंधनात अडकणार आहे. गेल्या काही वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत. एका खासगी समारंभात या दोघांचा साखरपुडा पार पडला. यावेळी काही सेलिब्रिटी, जवळचा मित्रपरिवार आणि काही कुटुंबीय उपस्थित होते. या साखरपुड्यातील एका व्हिडीओने खास नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. कारण या व्हिडीओत आमिर खान अत्यंत आनंदात नाचताना दिसतोय. ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटातील ‘पापा कहते है’ हे आमिरचं गाणं आजही तुफान लोकप्रिय आहे. लेकीच्या साखरपुड्यात आमिरने याच गाण्यावर डान्स केला. या व्हिडीओवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.

 

आयराच्या साखरपुड्याला आमिरच्या दोन्ही पूर्वाश्रमीच्या पत्नींनी हजेरी लावली होती. किरण रावने नुपूरसोबत बरेच फोटो काढले. यावेळी तिच्यासोबत मुलगासुद्धा उपस्थित होता. तर आमिरची पहिली पत्नी रीना दत्तानेही साखरपुड्याला हजेरी लावली होती. याशिवाय अभिनेत्री फातिमा सना शेखसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होती. मध्यंतरीच्या काळात आमिर आणि फातिमा यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. फातिमा आणि आयरा या एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेत.

कोण आहे आमिरचा होणारा जावई?
आयरा आणि नुपूर हे 2020 पासून एकमेकांना डेट करत आहेत. आयरा तिच्या आणि नुपूरच्या नात्याविषयी सोशल मीडियावर नेहमीच मोकळेपणे व्यक्त झाली. नुपूर हा बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना फिटनेसचं प्रशिक्षण देतो. त्याचप्रमाणे तो उत्तम डान्सरसुद्धा आहे. इतकंच नव्हे तर तो राज्यस्तरीय टेनिसपटूही होता.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम