स्मार्ट सिटी प्रकल्पावर मनपाने श्वेतपत्र काढावे”आप”ची मागणी

बातमी शेअर करा...

 

 

 

 

औरंगाबाद, 23 ऑगस्ट 2022 : केंद्राने स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत 1,000 कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी दिली आहे. निधीच्या बाबतीत सरकार 50% वाटा टाकणार आहे तर राज्य सरकार आणि औरंगाबाद महानगरपालिका (AMC) यांना प्रत्येकी 25% हिस्सा गुंतवला होता , परंतु खराब आर्थिक स्थितीमुळे मार्च 2022 पर्यंत 100 कोटी रुपयांचा हिस्सा गुंतवण्याचा निर्णय घेतला गेला आहे असे समजते. 2015 मध्ये शहरात स्मार्ट सिटी मिशन सुरू करण्यात आले होते. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिशन अंतर्गत 430 कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. AMC ने आपल्या वार्षिक बजेटमध्ये स्मार्ट सिटी मिशनमध्ये हिस्सा म्हणून ५० कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे.

या अनुषंगाने औरंगाबाद शहरात स्मार्ट सिटी योजना अंतर्गत 2015 नंतर कोण कोणते प्रकल्प पूर्ण झालेली आहेत, तसेच सध्या कार्यगत असलेली प्रकल्पे कोणती, 2015 पासून ते आजपर्यंत यावर झालेला खर्च, प्रकल्पांसाठी निर्धारित केलेले ठेकेदार व त्यांना झालेली फेड खर्च, या बाबतचा शासकीय श्वेत पत्र येत्या 15 दिवसात औरंगाबाद महानगरपालिका ने जाहिर करावे या आशयाचा निवेदन आज माजी सभापती मनपा इसाक अंडेवाला यांच्या प्रतिनिधित्वाखाली, व सुग्रीव मुंडे संघटक मराठवाडा, जालिंदर ढाकणे, सतीश संचेती यांच्या विशेष उपस्थितीत मनपा आयुक्त श्री अभिजित चौधरी यांना देण्यात आला. या श्वेत पत्राने महानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकास स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत पूर्णत्वास आणि सुरू असलेली कामे रेखांकित करता येईल. येत्या 15 दिवसात श्वेत पत्र जारी करावा अशी विनंती या निवेदनात देण्यात आली आहे. या प्रसंगी पार्टीचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते, ज्यात जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दत्तू पवार, रूपाली धनेधर, अमोल पाटणी, मजास खान, सय्यद नझीर, शेख हनिफ, भाऊसाहेब सपकाळ, शेख अझहर, मजेद हुसेन, गौरव भार्गव, शेख हबीब, अब्दुल हाई, अशीर जयहिंद आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम