गुजरातमध्ये आप आमदार करणार भाजपात प्रवेश !
दै. बातमीदार । ११ डिसेंबर २०२२ । देशातील भाजपची प्रतिष्ठेची असलेली गुजरात निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर एकहाती सत्ता भाजपला मिळाली आहे तर दुसरीकडे सोमवारी भूपेंद्र पटेल मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. तत्पूर्वी राज्यात पक्षांतराचा खेळ सुरू झाला आहे. आम आदमी पार्टीचा 1 व 3 अपक्ष आमदार उद्याच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी भाजपत प्रवेश करणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.
आप आमदार भूपत भयाणी प्रथमच जुनागड जिल्ह्यातील विसावदर मतदार संघातून विधानसभेवर पोहोचलेत. ते यापूर्वीही भाजपत होते. निवडणुकीला काही दिवसांचा अवकाश असताना ते आपमध्य गेले होते. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आपण भाजपत जाणार नसल्याचा दावा केला. मी आपला धोका देणार नाही, असे ते म्हणालेत. पण त्यांच्या पक्षांतराची चर्चा गुजरामध्ये चांगलीच रंगली आहे.
गुजरात विधानसभा निवडणूक 2 टप्प्यांत झाली. पहिल्या टप्प्याचे मतदान 1 व दुसऱ्या टप्प्याचे मतदान 5 डिसेंबर रोजी झाले. त्यानंतर 8 डिसेंबर रोजी मतमोजणी झाली. त्यात भाजपला सर्वाधिक 156 जागा मिळाल्या. तर काँग्रेसला 17 व आपला अवघ्या 5 जागांवर समाधान मानावे लागले. आपच्या तिकिटावरह विसावदर विधानसभा मतदार संघातून विधानसभेवर पोहोचलेले भूपत भयाणी या क्षेत्रातील भाजपचे माजी नेते होते. त्यांचा या भागात मोठा प्रभाव होता. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ते आपमध्ये गेले होते. या जागेवर भाजपने काँग्रेसमधून आलेल्या हर्षद रिबाडिया यांना उमेदवारी दिली होती. तर काँग्रेसने करशन वडोदरिया यांना तिकीट दिले होते. भूपतचा थेट सामना हर्षद रिबाडिया यांच्याशी होता. त्यात भूपत यांचा 6904 मतांनी पराभव केला. भूपत यांना 65675, तर हर्षद यांना 58771 मते मिळाली. तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या काँग्रेसच्या करशनभाई यांना अवघी 16781 मते मिळाली. विसावदर विधानसभा मतदार संघावर गत अनेक वर्षांपासून भाजपचे वर्चस्व होते. ही जागा 1995, 1998, 2002 व 2007 मध्ये भाजपच्या ताब्यात होती. पण 2012 च्या निवडणुकीत येथे जीपीपीचा उमदेवार निवडून आला. त्यानंतर 2017 च्या निवडणउकीत काँग्रेस नेते हर्षदकुमार रिबाडिया यांनी भाजपच्या किरीट बालुभाई पटेल यांचा पराभव केला. निवडणुकीपूर्वी हर्षदने भाजपत प्रवेश केला. पण त्यांचा आपच्या भूपत यांच्याकडून पराभव झाला.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम