अबब..राज्यातील या देवळात २०० किलो सोन्याचे दान !
दै. बातमीदार । १० जून २०२३ । राज्याला धार्मिकतेच वारसा असल्याने देशातील असंख्य भक्त राज्यातील देवळात येत असतात, त्याच माध्यमातून दान देखील या देवळात देत असतात. याचा एका मंदिरात तब्बल २०० किलो सोने दान स्वरूपात आल्याने राज्यभर चर्चेला उधान आले आहे.
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र तुळजापूर (जि. धाराशिव) येथील मंदिरात बुधवारपासून देणगी मोजण्यास प्रारंभ झाला आहे. गेले ३ दिवस २४ तास दानपेट्यांची मोजणी करत आहेत. त्यात २०० किलो सोने निघाले आहे. २०१८ नंतरच्या दोन पेट्या व २००९ ते २०१८ पर्यंतच्या दोन पेट्यांमधील मोजणी करण्यात आली. शुक्रवारी एका बाॅक्समध्ये हिरे आढळले. त्यांचे शनिवारी सोलापूर येथील कारागिराच्या मदतीने मूल्यमापन करण्यात येणार आहे. याशिवाय २०१८ नंतरची एक पेटी राहिली असून त्याची मोजणी होणार आहे. त्यानंतर चांदीची मोजणी करण्यास प्रारंभ होणार आहे.
आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या शासकीय पूजेनंतर व्हीआयपी लोकांना दर्शन बंद करण्यात येईल. तसेच महापूजेनंतर मंदिर परिसरात एकही वाहन सोडले जाणार नाही, अशा सक्त सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. दर्शन रांगेत उभा राहणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पालकमंत्री विखे पाटील यांनी शुक्रवारी पंढरपूर शहरात फिरून आषाढी यात्रेच्या तयारीची पाहणी केली. त्यानंतर ते बोलत होते. पालखी मार्गावर प्रत्येक दोन किलोमीटरवर पालखीसाठी थांबे असणार आहेत. नोंदणी असलेल्या पालख्यांसाठी सर्व सुविधा असतील.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम