गुंतवणूक खेचून आणण्याची क्षमता महाराष्ट्राकडे ; उपमुख्यमंत्री फडणवीस !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ११ ऑगस्ट २०२३ | राज्यात गेल्या काही दिवसापासून अनेक मोठ मोठे प्रोजेक्ट येत आहे. पण काही ना काही कारणाने दुसऱ्या राज्यात जात असतांना अनेक विरोधक सत्ताधारी गटावर टीका करीत आहे. यावर आता उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी भाष्य केले आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कि, गुंतवणूक खेचून आणण्याची अपार क्षमता महाराष्ट्राकडे आहे आणि वेदांता फॉक्सकॉन कंपनीला महाराष्ट्रात एक ना एक दिवस परत यावेच लागेल, असा विश्वासव्यक्त केला. वेदांता फॉक्सकॉनसारखी मोठी गुंतवणूक महाराष्ट्रातून का गेली, असे विचारले असता फडणवीस म्हणाले, की महाविकास आघाडी सरकारच्या काळात धोरण लकव्यासारखी स्थिती होती. निर्णयच होत नव्हते. प्रगत राज्य थांबले होते. राज्य सरकारच्या गुंतवणूक समितीची बैठक १८ महिने झालीच नाही, अशी परिस्थिती होती. पुण्याजवळील तळेगाव येथे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प येणार होता. पण गेल्यावर्षी हा प्रकल्प गुजरातला गेला नंतर फॉक्सकॉनने प्रकल्पातून माघार घेतली असली तरी आम्ही हा प्रकल्प पूर्ण करू, असे वेदांता कंपनीने आधीच स्पष्ट केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम