अ.भा.वि.प.च्या युवक सप्ताह निमित्त पुतळ्यांची स्वच्छता

युवक सप्ताह निमित्त चालणार विविध कार्यक्रम

बातमी शेअर करा...

पारोळा: अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या युवक सप्ताह निमित्ताने शहरातील सर्व पुतळ्यांची स्वच्छता अभियान यशस्वीरित्या राबविण्यात आली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि पारोळा नगरपालिकेच्या सहकार्याने आयोजित या उपक्रमाने स्वच्छतेचा संदेश दिला. शहरातील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या पुतळ्यांची देखभाल आणि स्वच्छता ही स्थानिक प्रशासन व सामाजिक संघटनांसाठी नेहमीच एक महत्त्वाची बाब राहिली आहे. पुतळ्यांवर साचलेली धूळ व घाणीचे थर काढून त्यांना नवे रूप देण्यात आले.यावेळी अ.भा.वि.प पारोळा शहर मंत्री अंकित पवार यांनी सांगितले की, “युवक सप्ताहाच्या निमित्ताने हा स्वच्छता उपक्रम केवळ स्वच्छता राखण्यासाठी नाही तर तरुणांना सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी आहे.”
नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, “शहर स्वच्छ ठेवणे हे केवळ प्रशासनाचेच काम नाही, तर प्रत्येक नागरिकाने त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.
कार्यक्रम यशस्वितेकरिता पारोळा नगरपरिषद कर्मचारी व पारोळा अ.भा.वि.प शहर मंत्री अंकित पवार, सह शहर मंत्री चेतन वैष्णव, श्याम खाडे यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम