अभाविप पारोळा शाखेकडून राष्ट्रीय विद्यार्थी दिन व ७७ व्या स्थापना दिनानिमित्त जल्लोष

बातमी शेअर करा...

पारोळा (जि. जळगाव) – अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पारोळा शाखेच्या वतीने आज राष्ट्रीय विद्यार्थी दिन व परिषदेच्या ७७ व्या स्थापना दिनानिमित्त उत्साहपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्ड वाटप व हँडबँड बांधण्याचा उपक्रम राबविण्यात आला. तसेच विविध महाविद्यालये, क्लासेस व बस स्थानकांवर जाऊन परिषदेसंबंधी माहिती देण्यात आली.

राष्ट्रीय पुर्ननिर्माणाच्या भावनेने ७७ वर्षांपासून कार्यरत असलेली ही संघटना शिक्षण, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारी जगातील सर्वात मोठी विद्यार्थी चळवळ असल्याची माहिती कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.

कार्यक्रमादरम्यान “छात्रशक्ती… राष्ट्रशक्ती”, “बंग के आनंद की… जय विवेकानंद की” अशा जोरदार घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. ७७ व्या स्थापना दिनाचा जल्लोष साजरा करत विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयतेची, सामाजिकतेची आणि शैक्षणिक जाणिव निर्माण करण्याचा संकल्प करण्यात आला.

याप्रसंगी अभाविप शहर मंत्री अंकित पवार, तालुका संयोजक दिगंबर कुंभार, सत्यम पाटील, अक्षय राजपूत, नरेंद्र चौधरी, पार्थ राजपूत तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम