जिल्ह्यात एसीबीची कारवाई : आरोग्य अधिकारी अटकेत !
बातमीदार | ४ सप्टेंबर २०२३ जळगाव जिल्ह्यात लाचखोर अधिकाऱ्यावर कारवाई करण्याच्या अनेक घटना एसीबीच्या माध्यमातून होत असतांना नुकतेच चाळीसगाव शहरातील केंद्र सरकारच्या आरोग्यवर्धिनी योजनेंतर्गत तक्रारदाराची जमीन भाड्याने घेवून त्यावर नियमित भाडे सुरू करण्यासाठी ५० हजारांची लाच मागून ती राहत्या घरात स्वीकारताना चाळीसगावातील रहिवासी व तत्कालीन तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी शहरातील शशिकला नगर रहिवासी देवराम किसन लांडे यास सोमवारी दुपारी 12 वाजता राहत्या घरातून अटक करण्यात आली. या कारवाईने आरोग्य यंत्रणेतील लाचखोर हादरले आहेत.
जळगाव जिल्ह्यातील तक्रारदाराने धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर लाच पडताळणी करण्यात आली. धुळे एसीबीचे डॅशिंग पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात सहकार्यांनी लाचखोर अधिकारी लांडे यास शशिकला नगरातील राहत्या घरातून बेड्या ठोकल्या.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम