शिंदे गट व भाजपच्या युतीचा निर्णय मान्य ; मंत्री गुलाबराव पाटील
दै. बातमीदार । ३ जानेवारी २०२३ राज्यात भाजपचे लोकसभा मिशन या माध्यमातून बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप युती असणार आहे. यामध्ये युतीचे नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील त्यात शून्य जागा जरी आम्हाला लढवावी लागल्या तरी तो मान्य राहील, असे मोठे विधान शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
भाजपच्या लोकसभा मिश वरून खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका केली होती. याबद्दल गुलाबराव पाटलांना विचारले असता संजय राऊत यांच्या म्हणण्याला मी भाव देत नाही. कुणीतरी मागच्या दरवाज्याने येणाऱ्या माणसाने हे म्हणावं आणि त्याला आपण मान्यता द्यावी, अशी टीका त्यांनी राऊतांवर केली. ‘भाजपाचे मिशन 145 आहे मात्र बाळासाहेबांची शिवसेना व भाजप आमची युती असणार आहे. तेव्हा या युतीमध्ये नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. यामध्ये शून्य जागा जरी लढवायला लागल्या तो आम्हाला मान्य राहील फक्त शिंदे साहेबांनी आम्हाला आदेश करावे’ असे गुलाबराव यांनी स्पष्ट केले आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम