
मंदिराला धडकून प्रशिक्षणार्थी विमानाचा अपघात ; एक ठार !
दै. बातमीदार । ६ जानेवारी २०२३ देशातील मध्य प्रदेशमध्ये एका गावाच्या मंदिराच्या शिखराला धडकून प्रशिक्षणार्थी विमानाचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये पायलटचा मृत्यू झाला आहे. तर, इंटर्न जखमी झाला. जखमीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हि घटना रीवा जिल्ह्यात घडली आहे.
चोरहाटा पोलीस स्टेशन हद्दीतील उमरी गावात हा विमान अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. वृत्तानुसार, प्रशिक्षणार्थी विमान एका मंदिराच्या शिखरावर आदळले, त्यामुळे हा अपघात झाला. विमानाला धडकताच आग लागली. या अपघातात वरिष्ठ पायलटचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर जखमी इंटर्नवर उपचार सुरू आहेत. अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
Madhya Pradesh | A pilot died while another was injured after a plane crashed into a temple in Rewa district during the training: Rewa SP Navneet Bhasin pic.twitter.com/KumJTAlALs
— ANI (@ANI) January 6, 2023
चोरहाटा पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक अवनीश पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रीवा हवाईपट्टीचे विमानतळामध्ये रूपांतर करण्यात येत आहे. खासगी कंपनी अनेक वर्षांपासून विमान प्रशिक्षण घेत आहे. उमरी गावात विमान अपघात झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम