केद्रीय मंत्र्याचा अपघात ; व्हिडीओ आला समोर !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ९ एप्रिल २०२३ ।  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील कायदामंत्री किरेन रिजिजू यांच्या कारला ट्रकने धडक दिली आहे. जम्मू काश्मीरमधील जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातातून किरेन रिजिजू बचावले आहेत. किरेन रिजिजू एकदम सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, मालाने भरलेला ट्रक वाहतूक कोंडीत अडकला होता. ट्रक रिव्हर्स घेत असतानाच किरेन रिजिजू यांच्या कारवर आदळला. या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओत सुरक्षा अधिकारी जवान अपघातानंतर गाडीच्या दिशेन धाव घेताना दिसत आहे. यावेळी ट्रकने एका बाजूने स्कॉर्पिओला धडक दिल्याचं दिसत आहे. सुरक्षा कर्मचारी गाडीजवळ पोहोचल्यानंतर दरवाजा उघडतात आणि त्यानंतर किरेन रिजिजू बाहेर येताना दिसत आहेत. यानंतर ते आपण ठीक असल्याचं सांगताना दिसत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम