अतिशय विद्युत वेगाने कारवाई ; मनसेची पहिली प्रतिक्रिया !

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २३ मार्च २०२३ ।  गुढीपाडव्याच्या संध्याकाळी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या जाहीर सभेत एक खळबळजनक दावा केला होता. माहीमजवळ समुद्रात अनधिकृत मजार उभारली जात असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला होता. महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे यांनी त्याचा व्हिडीओच जाहीरपणे दाखवला. तसंच, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अनधिकृत मजारवर कारवाई करावी, अशी थेट मागणी राज ठाकरेंनी केली होती.

सदर मागणी करताना, राज ठाकरे यांनी सरकारला एका महिन्याचा अल्टिमेटम देखील दिला होता. जर हा मजार हटवली नाही तर त्याच्या शेजारी गणपतीचं मंदिर उभं करण्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. मात्र राज्य सरकारने अवघ्या १२ तासांत भविष्यात कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीने अनधिकृत बांधकामावर हातोडा मारला त्याचसोबत जेसीबीने सर्व बेकायदेशीर बांधकाम हटवण्यास आले आहे.

संपूर्ण ही जागा पूर्ववत करण्यात आली आहे. रात्री उशिरा सभा संपल्यानंतर त्यानंतर काही जणांनी तिथे जाण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी बंदोबस्त वाढवल्यामुळे कुणालाही तिथे जाता आले नाही. सकाळी साडेसातच्या सुमारास प्रशासनाने मनुष्यबळ वापरून याठिकाणी अनधिकृत बांधकामावर हातोडा मारण्यात आला. सदर कारवाईनंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सदर प्रकरणामध्ये यश आणि अपयशचा प्रश्न नाहीय. महत्वाचा मुद्दा हा आहे की, मुंबईमध्ये जर अशाप्रकारे अतिक्रमण होत राहिलं, तर या मुंबईची बजबजपुरी व्हायला वेळ लागणार नाही, असं संदीप देशपांडे म्हणाले. तसेच अतिशय विद्युत वेगाने जर प्रशासन कारवाई करत असेल, तर राज्य सरकारचेही आम्ही अभिनंदन करतो, असं संदीप देशपांडे यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, माहीम समुद्रामधील या ठिकाणावर माहीम दर्गा ट्रस्टनं मोठा दावा केला आहे. ही जागा ६०० वर्षं जुनी आहे. राज ठाकरे म्हणतात त्याप्रमाणं ती आताच बांधलेली नाही. मुळात, हजरत मकदूम अली शाह हे याच जागी बसून हजरत ख्वाजा खिजर अली शाह यांच्याकडून शिक्षण घ्यायचे. ही ऐतिहासिक जागा आहे. तिथं दर्गा उभारण्याचा आमचा कुठलाही विचार नाही, असं माहीम दर्ग्याचे विश्वस्त सुहेल खंडवानी यांनी सांगितलं.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम