रेल्वे पोलिसांची कारवाई : मोठ्या शहरातून १३४ किलो गांजासह सोने जप्त !
बातमीदार | १५ ऑक्टोबर २०२३
राज्यभरात गेल्या तीन दिवसापासून ड्रग्जमाफिया ललित पाटील प्रकरण जोरदार चर्चेत असतानाच नुकतेच दौंड पुण्यामधून मोठ्या प्रमाणावर गांजा जप्त केल्याचे समोर आले आहे. पुणे रेल्वे स्थानकावरुन तब्बल 90 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. तसेच दौंडमध्ये रेल्वे पोलिसांनी मोठी कारवाई करत 44 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डीआरआयच्या कारवाईत मुंबई, नागपूर आणि वाराणसी वरून 31.7 किलो सोने जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी मुंबईतून पाच जणांना, नागपूरवरून चौघांना तर वाराणसी वरून दोघांना करण्यात अटक करण्यात आली असून जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत 19 कोटी रुपयांच्या घरात असल्याचे सांगण्यात येत आहे.
दौंड रेल्वे स्थानकामध्ये रेल्वे पोलिसांनी मोठी कारवाई करत 44 किलो गांजा केला आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. शनिवारी गाडी क्रमांक 11020 भुवनेश्वर मुंबई कोणार्क एक्सप्रेस या गाडीमध्ये बेवारस बॅग आहे, अशी माहिती कंट्रोल रूममधून रेल्वे पोलिसांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, पुण्यातही कस्टम विभागाने मोठी कारवाई केली आहे. ओडीसावरून पुण्याकडे येणाऱ्या कोणार्क एक्सप्रेसमध्ये गांजाची तस्करी होत असल्याची माहिती कस्टम विभागाला मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पुणे स्टेशनवर सापळा रचत कस्टम विभागाकडून दोन गांजा तस्करांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून 27 लाख रुपयांचा ९० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम