दै. बातमीदार । १८ मे २०२३ । बॉलीवूडमधील अभिनेता शाहरुख खानचा प्रत्येक चित्रपट नेहमीच चर्चेत येत असतो, व ते चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई देखील करीत असतात नुकताच पठाण सिनेमाच्या घवघवीत यशानंतर आता प्रेक्षकांचे लक्ष शाहरुख खानच्या आगामी ‘जवान’कडे लागले आहे. जवान सिनेमाचा एक छोटा टिझर काही महिन्यांपूर्वी समोर आला होता. त्यानंतर सोशल मीडियावर या सिनेमाचे अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होताना दिसत आहे.
हे सर्व सिनेमाच्या निर्मात्यांनी अजिबात व्हायरल केले नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे आता निर्मात्यांनी या व्हायरल होणाऱ्या गोष्टींबद्दल थेट कोर्टात धाव घेतली आहे. त्यावर दिल्ली उच्च न्यायालयाने ट्विटरकडे आगामी ‘जवान’ चित्रपटाच्या क्लिप शेअर करणाऱ्या युजर्सची माहिती मागितली आहे.
दिल्ली न्यायालयाने अशा सर्व लोकांचे ई-मेल, ‘आयपी अॅड्रेस’ आणि फोन नंबरची माहिती मागवली आहे ज्यावरून हे व्हिडिओ आणि फोटो शेअर केले जात आहेत. शिवाय या सिनेमाची निर्मिती करणाऱ्या रेड चिलीज एंटरटेनमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडने ही केस दाखल केल्यानंतर कोर्टाने YouTube, Twitter आणि Reddit यांना संपर्क करत चित्रपटाशी निगडित सर्व गोष्टी त्यांच्या साइटवरून काढून टाकण्याचे आदेश दिले.
कोर्टात रेड चिलीज एंटरटेनमेंट्सच्या वकिलांनी दावा करत सांगितले की, ट्विटरवर पाच असे अकाऊंट आहेत, ज्यावरून चित्रपटाशी संबंधित सर्व माहिती सतत शेअर नाही ‘लीक’ केली जात आहे. याआधी देखील एप्रिलमध्ये कोर्टाने अनेक वेबसाइट्स आणि इंटरनेट सेवा देणाऱ्यांना ‘जवान’ सिनेमाशी संबंधित फोटो, गाणी, ऑडिओ, व्हिडिओ क्लिप परवान्याशिवाय प्रदर्शित करण्यास, वापरण्यास मज्जाव केला होता.
जवान सिनेमाबद्दल सांगायचे झाले तर हा सिनेमा येत्या २ जूनला प्रदर्शित होणार होता, मात्र आता तो ७ सप्टेंबरला प्रदर्शित केला जाणार आहे. या सिनेमाबद्दल मोठा बज असून, शाहरुखला पुन्हा एकदा या सिनेमाच्या निमित्ताने ऍक्शन अवतारात पाहता येणार आहे. सिनेमात शाहरुख खानसोबत नयनतारा, विजय सेतुपति, सान्या मल्होत्रा आदी अनेक दिग्गज कलाकार दिसणार आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम