कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी केला मुख्यमंत्री शिंदेंचा पुतळा दहन!
दै. बातमीदार । ८ डिसेंबर २०२२ । राज्यातील सीमा वाद प्रश्नी कोणता हि तोडगा निघत नसल्याने राज्यातील विविध शहरातून कर्नाटकात जाणाऱ्या बसेसची राज्यातील विरोधक तोडफोड करीत आहे तर त्यातच महाराष्ट्रातील अनेक पक्षातील खासदारांनी सीमावादाचा प्रश्न केंद्राने सोडवावा अशी मागणी केली आहे. त्यामुळे हा वाद केंद्राने सोडवण्याच्या मागणीने जोर धरला असतानाच कर्नाटकात मात्र महाराष्ट्रविरोधी वातावरणाने आणखी जोर पकडला आहे.
आज कर्नाटकात महाराष्ट्राविरोधात वातावरण आणखी चिघळले असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुतळ्याचे कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी गदगमध्ये दहन केले आहे. त्यामुळे आता हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुतळ्याचे दहन केले गेल्याने आता कर्नाटकातील मराठी भाषिकांविरोधात तीव्र संपात व्यक्त केला जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राविरोधात लोकांच्या भावना भडकवल्या जात असल्याचे मत सीमाभागातील मराठी भाषिकांमधू व्यक्त केली जात आहेत. कर्नाटकातील गदगमध्ये महारष्ट्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शन केली आहेत. यावेळी महाराष्ट्रातून कर्नाटकात गेलेल्या वाहनांवर चढून कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुतळ्याचे दहन केले गेल्याने कर्नाटकातील मराठी भाषिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गदग शहरात कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राविरोधात आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी त्यांना समज देण्याचाही प्रयत्न केला. तरीही कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातून गेलेल्या वाहनांवर चढून जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शनं केली गेल्याने पोलिसांनी धरपकड केली. तर महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यातील आणि सोलापूर जिल्ह्यामधील काही गावांनी कर्नाटकात जाण्याचा निर्णय घेतला असल्याने सीमावादाला आता त्यामुळे वेगळे वळण लागले आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम