महामोर्चासाठी राज्यातील कार्यकर्ते दाखल ; मुंबई पोलिसांनी टाकल्या अटी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १७ डिसेंबर २०२२ । आज मुंबईत महाविकास आघाडीतर्फे भव्य महामोर्चा काढण्यात येत असून राज्यात महापुरुषांबाबत अवमानजनक वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व इतर भाजप नेत्यांविरोधात काढणार आहे. त्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून नेत्यासह कार्यकर्ते मुंबईत दाखल होत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अवमानजनक वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची पदावरून तातडीने हकालपट्टी करावी, अशी प्रमुख मागणी महाविकास आघाडीने केली आहे. तसेच, महापुरुषांबाबत अवमानजनक वक्तव्य करणाऱ्या भाजप नेते व प्रवक्त्यांवरही कारवाई करावी, सीमाभागात मराठी भाषिकांची कर्नाटक सरकारकडून होणारी गळचेपी थांबवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ठोस भूमिका घ्यावी, या मागण्यांसाठी मविआतर्फे हा महामोर्चा काढला जात आहे. आज सकाळी नागपाडा येथील रिचर्डसन अँड कृडास येथून मोर्चाला सुरूवात होणार आहे. महाविकास आघाडातील सर्व प्रमुख नेते या मोर्चात सहभागी होणार आहेत. महामोर्चासाठी राज्यभरातून महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मुंबईत दाखल होत आहेत. मोर्चात 1 लाख लोक सहभागी होतील, असा महाविकास आघाडीचा दावा आहे. भायखळा ते सीएसएमटी असे 5.30 किलोमीटर अंतर मोर्चेकरी चालणार आहेत. सरकारने 14 अटींसह मोर्चाला परवानगी दिली.

मुंबई पोलिसांच्या महामोर्चासाठी अटी
महामोर्चा शांततेत काढावा. कोणत्याही नेत्याने प्रक्षोभक भाषण करू नये.
मोर्चात काठी-लाठ्या तसेच यासारखे इतर हत्यारे घेऊन सहभागी होता येणार नाही
मोर्चामुळे कुठेही कायदा-सुव्यवस्थेला बाधा होऊ नये, याची काळजी आयोजकांनी घ्यावी
मोर्चादरम्यान पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन मोर्चेकरांनी करावे.
मोर्चादरम्यान फटाके वाजवण्यावर बंदी असेल.
पोलिसांनी मंजूर केलेल्या मार्गावरूनच मोर्चा काढावा. कोणत्याही परिस्थिती मोर्चाचा मार्ग बदलू नये.
मोर्चा एकाच ठिकाणी जास्त वेळ रेंगाळून ठेवू नये
मोर्चात सहभागी होणाऱ्या वाहनांची खातरजमा आयोजकांनी करावी
मोर्चात अश्लील, आक्षेपार्ह हावभाव, वक्तव्य करू नये
कोणत्याही क्षणी मोर्चा रद्द करण्याचा आदेश पोलिस देऊ शकते. त्याचे पालन करावे लागेल.
महाविकास आघाडीच्या मोर्चामुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत आज सांयकाळपर्यंत बदल करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी या बदलाविषयी माहिती दिली आहे. त्यानुसार रिचर्डसन्स क्रूडास मिल, सर जे.जे. उड्डाणपूल, डॉ. दादाभाई नवरोजी रोड, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-टाईम्स ऑफ इंडिया हे मार्ग वाहतुकीसाठी बंद असणार आहेत. या मार्गांऐवजी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.
दक्षिण मुंबईत प्रवास करणाऱ्या वाहनांनी गॅस कंपनी-चिंचपोकळी पूल- आर्थर रोड- सात रास्ता सर्कल- मुंबई सेंट्रल- लॅमिंग्टनरोड- ऑपेरा हाउस-महर्षी कर्वे रोड (क्वीन्स रोड) या पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, वाहन चालकांना सात रस्ता सर्कल- मुंबई सेंट्रल- तारदेव सर्कल- नाना चौक- एन.एस. पुरंदरे रोड मार्गाचा वापर करता येईल, असे मुंबई पोलिसांतर्फे सांगण्यात आले आहे. समाजवादी पक्ष, सीपीआय, सीपीएम, लाल निशाण पक्ष, शेकाप, मराठा क्रांती ठोक मोर्चा, रिपाइंचा निकाळजे गट अशा 25 पक्ष-संघटनांनी महामोर्चाला पाठिंबा दिल्याचा दावा महाविकास आघाडीने केला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम