दै. बातमीदार । ५ एप्रिल २०२३ । देशभर स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेने डॉ. अमोल कोल्हे यांना प्रचंड प्रसिद्धी मिळविणारे अभिनेते आणि खासदार डॉ.अमोल कोल्हे नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असतात. अमोल कोल्हे त्यांच्या कामाच्या विविध अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असतात.
सोशल मीडियाच्या माध्यमातून ते नेहमीच चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे गेल्या काही काळात ग्रामीण भागात अमोल कोल्हे यांचा मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे. अनेक ऐतिहासिक भूमिका साकारल्यामुळे नागरिक त्यांच्याकडे कायम आदराने पाहतात. अमोल कोल्हे यांचे कोल्हापूर प्रेम सर्वांनाच माहिती आहे. कधी ते कोल्हापूरच्या रंकाळ्याला भेट देताना दिसतात तर कधी ते कोल्हापूरमधील फेमस वडा खाताना दिसतात. आता देखील त्यांना कोल्हापूरी मिसळ पाहून राहवलचं नाही..मग त्यांनी त्यांचा रोजचा पण मोडला आणि मिसळ खाण्याचं ठरवूनच टाकलं.
अमोल कोल्हे सध्या कोल्हापूरात आहेत. कोल्हापुरात स्वराज्याच्या छाव्याचा धगधगता इतिहास मांडणारे अतिभव्य महानाट्य ‘शिवपुत्र संभाजी’सादर होणार आहे. या प्रयोगासाठी सर्व टीम कोल्हापूरात आहे. कोल्हापूर म्हटल्यांवर योगायोगानं खाणं आलचं. कारण कोल्हापूरची खाद्यसंस्कृती जगात भारी आहे. अमोल कोल्हे त्यांच्या व्यायामाच्या बाबतीत किती शिस्तबद्ध आहेत, हे सर्वांनच माहिती आहे. पण कोल्हापूरची मिसळ पाहिल्यानंतर त्यांना देखील राहवलं नाही..त्यांनी देखील वर्कआऊट मध्येच सोडलं आणि कोल्हापूरी मिसळ खायला बाहेर पडले. चाहत्यांच्या पसंतीच्या ठिकाणीच त्यांनी मिसळ खाण्याचं ठरवलं आहे. अमोल कोल्हे यांनी इन्स्टावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, नादखुळा..काटाकीर्रररर् मिसळ खायला कोल्हापूरात कुठं जाऊ ते सांगा? कमेंट करून सांगाआयकलं का कोल्हापूरकर ?? यायला लागतंय…कोल्हापुरात सादर होणार स्वराज्याच्या छाव्याचा धगधगता इतिहास मांडणारे अतिभव्य महानाट्य!’शिवपुत्र संभाजी’दि. ०७ ते १२ एप्रिल..दररोज सायंकाळी ६ वाजता.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम