अभिनेता अनुपम खेर शूटिंगदरम्यान जखमी !
दै. बातमीदार । २२ मे २०२३ । देशातील बॉलिवूडमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करून अनुपम खेर यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या अभिनयाचं नेहमीच कौतुक होत आलं आहे. पण आता त्यांच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. अनुपम खेर हे एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जखमी झाले आहेत. अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून या अपघाताची माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे.
अनुपम खेर नुकतेच त्यांच्या आगामी ‘विजय 69’ या चित्रपटाचं शूटिंग करत होते. याच चित्रपटाच्या सेटवर शूटिंग दरम्यान अनुपम खेर जखमी झाले. अनुपम यांनी सोमवारी सकाळी इन्स्टाग्रामवर हात फॅक्चर असलेला एक फोटो शेअर करून आपल्या चाहत्यांना ही माहिती दिली आहे. हाताला फॅक्चर असलं तरी कॅमेरासमोर पोज देताना अनुपम खेर यांच्या चेहऱ्यावर हसू आहे.
काय लिहिले आहे पोस्टमध्ये?
“तुम्ही एका स्पोर्ट फिल्ममध्ये काम करताय आणि तूम्हाला काही दुखापत होणार नाही असं कसं होऊ शकतं? दुखत आहे, पण जेव्हा हे स्लिंग खांद्यावर ठेवणाऱ्याने सांगितले की, त्याने शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि हृतिक रोशनवर (Hrithik Roshan) सुद्धा हे उपचार केले आहेत, तेव्हा माझं दुखणं जरा कमी झालं.” अनुपम पुढे म्हणाले, “मी जरा जोरात खोकलो, तर माझ्या तोंडातून एक छोटीशी किंकाळी नक्कीच बाहेर पडते! पण या फोटोत हसण्याचा प्रयत्न खरा आहे! काही दिवसांनी शूटिंग पुन्हा सुरू होईल.” अशा भावना त्यांनी आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केल्या आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला अनुपम यांनी त्यांच्या नवीन चित्रपट ‘विजय 69’ ची घोषणा केली होती. हा चित्रपट अशा एका व्यक्तीवर आधारित आहे जो वयाच्या 69 व्या वर्षी ट्रायथलॉन स्पर्धेत भाग घेण्याचा निर्णय घेतो. या चित्रपटाचे दिग्दर्शन अक्षय रॉय (Akshay Roy) करणार आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम