अभिनेते कमल हासन प्रकुर्ती बिघडल्याने रुग्णालयात दाखल !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २४ नोव्हेबर २०२२ । ‘मक्कल निधी मय्यम’ या पक्षाचे संस्थापक आणि प्रसिद्ध अभिनेते कमल हासन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चेन्नईतील श्री रामचंद्र मेडिकल सेंटरमध्ये त्यांच्यावर बुधवार संध्याकाळपासून उपचार सुरु आहेत. त्यांना नियमित आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांना पुढील दोन दिवस पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिल्याचे समजते.

कमल हासन हे नुकतेच हैदराबादला गेले होते. तिथे त्यांनी त्यांचे गुरू आणि दिग्गज दिग्दर्शक के विश्वनाथ यांची भेट घेतली. दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तिथल्या काही कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्यानंतर ते बुधवारी दुपारी चेन्नईला परतले. मात्र संध्याकाळी बरे वाटत नसल्याने चेक-अपसाठी ते रुग्णालयात दाखल झाले. त्यांना आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. कमल हसन यांच्याकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. ते सध्या बिग बॉस तामिळ सीझन 6 चे सूत्रसंचालन करत आहेत. कमल हासन यांचा काही दिवसांपूर्वीच ‘विक्रम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर तुफान प्रतिसाद मिळाला. सध्या ते ‘इंडियन 2’ या तामिळ चित्रपटावर काम करत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम