‘पठाण’साठी अभिनेता खानने घेतले माँ वैष्णोदेवीचे दर्शन

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १२ डिसेंबर २०२२ ।  माँ वैष्णोदेवीचे दर्शन घेण्यासाठी अभिनेता शाहरुख खानने रविवारी दि ११ रोजी  आला होता. तो त्याच्या आगामी ‘पठाण’ या चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना करण्यासाठी येथे पोहोचला होता, असे म्हटले जात आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये शाहरुखचा चेहरा दिसत नाहीये. त्याने काळ्या रंगाचे जॅकेट, डोक्यावर हुड आणि चेहऱ्यावर मास्क घातलेला दिसतोय.

शाहरुख खान काही दिवसांपूर्वी ‘डंकी’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करून मक्केला पोहोचला होता. शाहरुखने तेथे उमराह (प्रार्थना) केला होता. हा फोटो शेअर करत सौदी अरेबियातील एका पत्रकाराने शाहरुखने मक्का गाठल्यानंतर उमराह केल्याची पुष्टी केली होती. यावेळी तो पांढऱ्या कपड्यात दिसला होता.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम