अभिनेता प्रभास अडकणार लग्न बंधनात ; कोण आहे नवरी ?

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ७ जून २०२३ ।  देशातील साऊथमध्ये नेहमीच सुपरस्टार म्हणून ओळख असलेल्या प्रभासचा बहुप्रतीक्षीत आणि बहुचर्चित चित्रपट ‘आदिपुरुष’ १६ जूनला प्रदर्शित होतो आहे. चित्रपटाच्या रिलीजच्या १० दिवस आधी निर्मात्यांनी फायनल ट्रेलर लाँच केला आहे. या नवीन ट्रेलरमध्ये नवीन सीन आणि डायलॉग्स पाहायला मिळाले. मात्र प्रभास चर्चेत येण्यामागे आदिपुरुषचा ट्रेलर कारणीभूत नाही तर त्याने ट्रेलर लाँचवेळी दिलेले उत्तर आहे.

खरेतर प्रभास देशातील मोस्ट एलिजिबल बॅचलर्सपैकी एक आहे. अशात त्याचे चाहते नेहमीच त्याच्या रिलेशनशीप आणि लग्नाबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. मात्र या प्रश्नांवर नेहमीच तो चुप्पी साधतो. मात्र आता त्याने चाहत्यांची उत्सुकता शांत करण्यासाठी हैराण करणारे उत्तर दिले आहे. आदिपुरुष चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी जेव्हा त्याला लग्नाबद्दल विचारण्यात आले तेव्हा प्रभासने मजेशीर अंदाजात म्हटले की, मी तिरुपतीमध्ये लग्न करणार आहे. त्याच्या या उत्तराने चाहत्यांमधील उत्सुकता आणखी वाढली आहे. ट्रेलर लाँचवेळी, प्रभासने आपल्या चाहत्यांना एक वचनदेखील दिले. आता तो दर वर्षी दोन चित्रपट घेऊन येणार आहे. इतकेच नाही तर त्याने हेदेखील म्हटले की, शक्य असेल तर तिसऱ्या चित्रपटावरदेखील काम करायला सुरूवात करेन. एसएस राजामौलींच्या बाहुबली आणि बाहुबली २ नंतर प्रभास पॅन इंडिया स्टार बनला आहे. फक्त साऊथमधीलच नाही तर देशभरातील प्रेक्षक त्याच्या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत असतात.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम