अभिनेता प्रशांत दामलेंवर कोसळले दुख ; आईचे झाले निधन !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ७ सप्टेंबर २०२३ | मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील एक झगमगते नाव म्हणजे अभिनेते प्रशांत दामले यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. प्रशांत दामले यांच्या आई विजया दामले यांचे निधन झाले. बुधवारी सकाळी १० च्या सुमारास त्यांचे राहत्या घरी निधन झाले.

विजया दामले या ८२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे दामले कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. प्रशांत दामले हे नाटकाच्या प्रयोगासाठी मुंबई बाहेर होते. त्याचवेळी त्यांना आईच्या निधनाची माहिती समजली. त्यानंतर ते नाटकाचे प्रयोग थांबवून थेट मुंबईला आले. त्यानंतर त्यांच्या आईच्या पार्थिवावर आंबोली स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रशांत दामले यांनी नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही क्षेत्रामध्ये दमदार अभिनयच्या जोरावर स्वत:चं वेगळं अस्तित्व निर्माण केले आहे. मराठी रंगभूमीवर नाटकांच्या प्रयोगांचे विक्रम प्रशांत दामले यांनी केले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी १२,५०० प्रयोगांचा टप्पा ओलांडला होता. प्रशांत दामले हे त्यांचे प्रसिद्ध ‘नियम व अटी लागू’ या नाटकाच्या प्रयोगसाठी अमेरिका दौऱ्यावर जाणार होते. पण त्याचपूर्वी त्यांच्या आईचे निधन झाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम