
अभिनेता राजपाल यादव अडचणीत ; पोलिसात गुन्हा नोंद !
दै. बातमीदार । १३ डिसेंबर २०२२ । विनोदी अभिनेता राजपाल यादव नेहमीच विविध कारणाने चर्चेत येत असतो. पण त्याचा अडचणीत वाढ झाली आहे. एका शूटिंगदरम्यान राजपालने विद्यार्थ्यासोबत गैरवर्तन आणि शिवीगाळ केल्यामुळे त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
राजपाल यादव मुख्य भूमिकेत असलेल्या शशांक श्रीवास्तवच्या आगामी सिनेमात त्याचे शुटींग सुरु आहे. राजपालचे कर्नलगंजमध्ये या सिनेमाचं शूटिंग करत आहे. एका सीनच्या शूटिंगदरम्यान त्याला स्कूटर चालवायची होती. पण स्कूटर चालवत असताना क्लच वायर तुटली आणि एका रिक्षाला ती धडकली. त्यामुळे एका विद्यार्थ्याला दुखापत झाली. विद्यार्थाला दुखापत झाल्याने त्याने चांगलाच गोंधळ घातला. त्यामुळे युनिटमधील मंडळींनी त्याच्याशी गैरवर्तन केले. त्यानंतर विद्यार्थ्याने थेट राजपाल यादव विरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत त्याने म्हटलं आहे,”युनिटमधील लोकांनी माझ्यासोबत गैरवर्तन केलं आहे. तसेच शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे”.
Uttar Pradesh | A student, Balaji, has filed a complaint against Actor Rajpal Yadav at Colonelganj PS, Prayagraj, accusing the actor of hitting him with a scooter. Actor Rajpal Yadav has also filed a complaint against the student for creating hindrances during film shooting.
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) December 12, 2022
विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर शूटिंगमध्ये अडथळा आणल्याबद्दल विद्यार्थ्याविरोधात शूटिंग युनिटने तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी बोलताना कर्नलगंज पोलिस स्टेशनचे प्रभारी राममोहन राय म्हणाले,”दोघांच्याही विरोधात तक्रार दाखल झाली आहे. त्यामुळे आता चौकशीनंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल”.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम