अभिनेत्री आलिया भट्टच्या जवळच्या व्यक्तीचं निधन !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १ जून २०२३ ।  गेल्या काही महिन्यापासून बॉलीवूड क्षेत्रात अनेक दिग्गजांचे निधन झाले असून त्या पाठोपाठ अभिनेत्री आलिया भट्टच्या जवळच्या व्यक्तीचं निधन झालं. आलियाचे आजोबा म्हणजे अभिनेत्री सोनी राजदान चे वडील नरेंद्रनाथ राजदान यांचं निधन झालं. ते 95 वर्षांचे होते. आलियाचे आजोबा मागील वर्षभरापासून आजारी होते. त्यांच्या फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन झालं होतं. त्यांच्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र इन्फेक्शन कमी होण्याऐवजी वाढू लागल्यानं त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं. दरम्यान उपतारांती गुरूवारी त्यांचं निधन झालं. आजोबांबरोबर आलियाचं फार गोड नातं होतं. त्यांच्या निधनानंतर आलिया फार भावुक झाली आहे.

तिनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिचं दुख: व्यक्त केलंय. आलियाची आई अभिनेत्री सोनी राजदाननं देखील आपल्या वडिलांच्या जाण्यानं शोक व्यक्त केला आहे. आलियानं आजोबांच्या निधनानंतर सोशल मीडियावर त्यांच्या वाढदिवसाचा एक क्यूट व्हिडीओ शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आलियानं म्हटलंय, माझे आजोबा, माझे हिरो.

93व्या वर्षी ते गोल्फ खेळायचे, काम करायचे, सगळ्यात भारी ऑम्लेट करायचे, सुंदर गोष्टी सांगायचे, वॉयलिन वाजवायचे, आपल्या पणतीला खेळवलं. त्यांना क्रिकेट खेळणं, स्केचिंग करणं खूप आवडायचं. आपल्या कुटुंबावर ते खूप प्रेम करायचे आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी खूप प्रेम दिलं. त्यांनी स्वत:च्या आयुष्यावर खूप प्रेम केलं. तुमच्या जाण्यानं माझं मन दु:खीही आहे आणि आनंदीही आहे कारण माझे आजोबांनी आम्हाला संपूर्ण आयुष्यात खूप आनंद दिलाय.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम