अभिनेत्री अरोरा पडली या अभिनेत्याच्या प्रेमात !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ८ एप्रिल २०२३ ।  बॉलीवूड क्षेत्रामध्ये प्रत्येक अभिनेत्रीसह अभिनेत्याचे खाजगी आयुष्य नेहमीच चर्चेत येत असते. तसेच यातील अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच सोशल मिडीयावर देखील सक्रीय असल्याचे नेहमीच दिसत आहे. २०१७ मध्ये बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराने अभिनेता अरबाज खानला घटस्फोट दिला होता. त्यानंतर आता ती अभिनेता अर्जुन कपूर सोबत रिलेशनशीपमध्ये आल्याची बातमी समोर आली आहे.

मलायका ४९ आणि अर्जुन कपूर ३७ वर्षांचा आहे. वयाच्या अंतरामुळे त्यांच्या नात्याचीही खूप चर्चा झाली. अर्जुन आणि मलायका एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांच्या अफेअरला बरीच वर्षे झाली आहेत. अनेकदा दोघंही एकत्र दिसतात आणि त्यांच्या प्रेमावर मोकळेपणाने चर्चा करतात. आता प्रमोशन दरम्यान मलायकाने अर्जुन कपूरसोबतच्या लग्नाबाबत मौन सोडले आहे.
मलायका अरोरा ब्राइड्स टुडेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली की, होय आम्ही लग्नाचा विचार करतो आहे. काही लोक तर आम्हाला स्वार्थी समजतात पण ते एकमेकांवरचे प्रेम असते. माझा परंपरा आणि संस्थांवर विश्वास आहे. लग्न आणि प्रेमाबद्दल बोलताना मलायका अरोरा पुढे म्हणाली की, माझा प्रेम आणि सौहार्द या दोन्हींवर विश्वास आहे. लग्न कधी होईल हे सांगता येत नाही. कारण आयुष्याबद्दल फारसे नियोजन नसावे असे माझे मत आहे. आयुष्याबद्दल खूप नियोजन केल्याने आयुष्यातील मजा खराब होते.

तिच्यापेक्षा ११ वर्षांनी लहान असलेल्या अर्जुन कपूरला डेट करताना मलायका म्हणाली की, तो त्याच्या वयाच्या बाबतीत खूप शहाणा आहे. तो खूप शांत आणि कणखर मनाचा माणूस आहे. खुल्या विचारांसोबतच तो खूप काळजीही घेतो. पुढे ती म्हणाली, पुढील ३० वर्षे ती हेच काम करत राहील. तिला घरी बसायचे नाही. मला प्रवास करायचे आहे. मला स्थिरावायचे आहे. मला आमचे नाते कायमचे जपायचे आहे. कारण मला वाटते की आम्ही दोघंही त्यासाठी तयार आहोत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम