अभिनेत्री हंसिकाने साजरी केली बॅचलर पार्टी !
दै. बातमीदार । २७ नोव्हेबर २०२२ । अलीकडे सोशल मिडीयावर नेहमी चाहत्यांना प्रतिसाद देणारी अभिनेत्री हंसिका मोटवानीने तिच्या गर्ल गँगसोबत तिची बॅचलर पार्टी साजरी केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने चाहत्यांना तिच्या बॅचलर पार्टीची झलक दाखवली आहे. ही पार्टी ग्रीसमध्ये साजरी करण्यात आली. या क्लिपमध्ये हंसिकाशिवाय लोकप्रिय अभिनेत्री श्रिया रेड्डीसह तिचे अनेक मित्रही दिसत आहेत.
हा व्हिडिओ शेअर करत हंसिकाने लिहिले, ‘बेस्ट बॅचलरेट एव्हर’. या सुपर फन बॅचलरेट पार्टीमध्ये हंसिका पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली असून त्यावर ‘ब्राइड’ असे लिहिले आहे. त्याच वेळी, तिच्या ब्राइड्समेड्स कस्टमाइज्ड काळ्या गाऊनमध्ये दिसत आहेत. नंतर ती पांढऱ्या क्रॉप्ड शर्ट आणि मिनी स्कर्टमध्ये पार्टीमध्ये येताना दिसते. अभिनेत्रीची मैत्रिणीसोबतच्या धमाल-मस्तीच्या सहलीची झलकही या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आली आहे.
हंसिका तिचा बॉयफ्रेंड सोहेल कथुरियासोबत 4 डिसेंबरला लग्न करणार आहे. त्यांच्या लग्नाचे कार्यक्रमही सुरू झाले आहेत. अलीकडेच हंसिकाच्या कुटुंबीयांनी मुंबईत माता की चौकी ठेवली होती, तिथे ती स्पॉट झाली होती. या पूजेत केवळ त्यांचे खास मित्र आणि कुटुंबातील सदस्य सहभागी झाले होते. या फंक्शनमध्ये हंसिका रेड मिरर वर्कच्या साडीत दिसली. यासोबत मॅचिंग कलरचे कानातले पण घातले होते, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती. हंसिका मोटवानी मुंबईपासून दूर जयपूरमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करणार आहे. त्यासाठी त्यांनी जयपूरचा 450 वर्ष जुना किल्ला फायनल केला आहे. 2 डिसेंबरला हंसिका आणि सोहेलचा हळदी समारंभ आणि त्यानंतर संध्याकाळी सुफी नाईट होणार असल्याचंही बोललं जात आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 डिसेंबरला मेहेंदी आणि संगीत होणार आहे. 4 डिसेंबरला लग्न होणार आहे. याशिवाय लग्नानंतर पोलो मॅच आणि कॅसिनोचेही नियोजन केले जात आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम