अभिनेत्री करीना कपूर होणार तिसऱ्यांदा आई !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २१ फेब्रुवारी २०२३ । अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर यांनी आपल्या चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. अभिनेत्री करीना कपूर तिसऱ्यांदा आई बाबा होण्यासाठी सज्ज झाले आहेत. तैमूर आणि जेह यांना खेळण्यासाठी आणखी एक भावंडं येणार आहे. त्यामुळे सध्या बॉलिवूडमध्ये करीना आणि सैफच्या होणाऱ्या बाळाची खूप चर्चा होत असल्याचं दिसत आहे.

हे सगळं ऐकून तुम्हालाही धक्का बसला असेल ना, पण एक मिनिट थांबा ! हे आम्ही नाही तर सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले करीनाचे बेबी बम्पचे फोटो सांगत आहेत. सध्या सोशल मीडियावर बेबो म्हणजेच करीनाचे बेबी बम्प दिसतील असे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

व्हायरल फोटो आणि व्हायरल व्हिडिओवर स्वतः करीना आणि सैफने पुढे येत खुलाससुद्धा केला आहे, त्यामुळे करीनाच्या प्रेग्नन्सीच्या चर्चाना उधाण आलं आहे. करीना कपूर खान सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असत. रोज तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर अपलोड करत असते, सोशल मीडियावर करीना स्वतःचेच नाही तर, लेकाचे तैमूर आणि जेहचे अनेक क्युट व्हिडीओ आणि फोटो अपलोड करत असते.

करीनासोबत तिची दोन्ही मुलं नेहमीच कोणत्या ना कोणत्या इव्हेंटमध्ये एकत्र दिसतातच . पापाराझीसुद्धा त्यांचे फोटो आणि व्हिडीओ कॅप्चर करत असतात. तैमूरची तर प्रसिद्धी आपण सर्वच जाणतो एवढ्याश्या वयात तैमूर आई आणि वडिलांप्रमाणेच फेमस आहे. पण सध्या करीना प्रेगनंत असल्याच्या चर्चाना उत्तर देताना करीनाने खुलासा केला आहे. ती म्हणतेय सैफ अली खानाने देशाची लोकसंख्या वाढवण्यात आधीच खूप योगदान दिल आहे, एन्जॉय. त्यामुळे आता आणखी नको ” असं म्हणत होणाऱ्या चर्चाना करीनाने पूर्णविराम दिलेला आहे.

एकूणच काय कलाकार आणि अफवा हे खूप जून नातं आहे. कलाकारांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत अनेक अफवा समोर येत असतात. त्याचप्रमाणे करीना पुन्हा एकदा आई होणार आहे ही बातमी सुद्धा अफवा असल्याचंच म्हटलं जात आहे. व्हायरल होत असलेला फोटो हा जुना असून सोशल मीडियावर तोच जुना फोटो पुन्हा ट्रेंड होतोय आणि त्यामुळेच ती पुन्हा प्रेग्नन्ट असल्याचा बातम्यांना उधाण आलं आहे. करीना कपूर खान तिसऱ्यांदा प्रेग्नन्ट असून लवकरच घरी पाळणा हलणार असल्याच्या बातम्या या निव्वळ अफवा आहेत हे स्पष्ट झालेले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम