अभिनेत्री क्रांतीचे एकाच दिवसात झाले 4 ऑपरेशन्स !
दै. बातमीदार । ११ मार्च २०२३ । राज्यात मराठी सिनेसृष्टीत आपली ओळख जबरदस्त छाप पडणारी व ‘श्रीमंत गंगाधर पंत’, ‘खो-खो’, ‘जत्रा’, ‘नो एंट्री’ सारख्या सिनेमातून काम करणारी अभिनेत्री म्हणजे क्रांती रेडकर. हि नेहमीच आपल्या सोशल मिडीयावर सक्रीय असतांना दिसून येते. क्रांती तिच्या दोन्ही जुळ्या मुलींबरोबरचे मजेशीर व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळत असते. सिनेसृष्टीतील अनेक कलाकार देखील तिच्या व्हिडीओवर फिदा असतात.
पण क्रांतीनं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती दिवसभरात तिची 4 ऑपरेशन्स झाल्याचं सांगत आहे. क्रांती तशी फिटनेस फ्रिक आहे पण अचानक तिला काय झालं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. क्रांतीनं अभिनेत्री म्हणून अनेक मालिका, सिनेमा आणि नाटकांमध्ये कामं केली. त्यानंतर क्रांती दिग्दर्शिका म्हणून नवी ओळख निर्माण करत आहे. ‘काकण’ सारख्या सिनेमाचं दिग्दर्शन तिनं केलं. त्यानंतर आता ‘रेनबो’ हा तिचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अभिनय क्षेत्रापासून दूर असली तरी क्रांती सोशल मीडियावर अँक्टिव्ह असते. लेकांबरोबर धम्माल व्हिडीओ शेअर करत असते. यावेळीही तिनं मुलींबरोबरचा व्हिडीओ शेअर केला आहे. क्रांतीनं शेअर केलेल्या व्हिडीओला तिनं ऑपरेशन डॉक्टर असं कॅप्शन दिलं आहे. क्रांती फारच गंभीर दिसत आहे. तिच्या कपाळावर प्लॉस्टिकच्या चिकटपट्ट्या चिकटवल्या आहेत. व्हिडीओमध्ये क्रांती म्हणतेय, “घरी डॉक्टर सेट आलेला आहे आणि सकाळपासून माझ्यावर 4 ऑपरेशन्स झाले आहेत. मायक्रोस्कोपनं पेशंटला पाणी पाजलं जात आहे. असं सगळं चालू आहे. दोघींनी तब्येत बरी नव्हती. दोघींना बरं वाटावं म्हणून डॉक्टर सेट आणले आहेत”.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम