अभिनेत्री परिणीती चोप्राचा व खा.चढ्ढाच्या नात्यात होणार साखर पेरणी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १३ मे २०२३ ।  सोशल मिडीयावर प्रंचड व्हायरल झालेली बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांचा आज १३ मे रोजी साखरपुडा होत आहे. दिल्लीत हा साखरपुड्याचा कार्यक्रम धुमधडाक्यात पार पडणार आहे.

हा कार्यक्रम कपूरथला हाऊस, दिल्ली येथे होणार आहे. बहिणीच्या साखरपुड्यासाठी तिची चुलत बहीण प्रियांका चोप्रादेखील दिल्लीत दाखल झाली आहे. तत्पूर्वी परिणीतीच्या मुंबईत येथील घरीदेखील रोषणाई करण्यात आली. आता साखरपुड्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांची यादी समोर आली आहे. आज संध्याकाळी 5 वाजता साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू होणार आहे. परिणीती आणि राघव दोघेही पंजाबी असल्याने पंजाबी पद्धतीने हा कार्यक्रम होईल. सर्वप्रथम सुखमणी साहिबचे पठण केले जाईल. यानंतर प्रार्थना होईल आणि नंतर दोघे एकमेकांना अंगठी घालतील. या साखरपुड्याला परिणीती आणि राघव यांनी बॉलिवूड आणि राजकारणातील मंडळींना आमंत्रित केले आहे. जवळजवळ 150 पाहुणे या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. बॉलिवूडमधून करण जोहर, रणवीर सिंग, दीपिका पादुकोण, सानिया मिर्जा, अर्जुन कपूर, मलाइका अरोरा, फराह खान यांचा समावेश पाहुण्यांमध्ये आहे. तर राघव यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे सुप्रीमो अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनाही साखरपुड्यासाठी आमंत्रित केले आहे.

परिणीती आणि राघव यांच्या साखरपुड्यात येणाऱ्या पाहुण्यांसाठी खास मेजवानी असणार आहे. वेगवेगळ्या पदार्थांची मेजवानी असणार आहे. परिणीतीला कबाब आवडत असल्याने मेन्यूमध्ये कबाबचादेखील समावेश करण्यात आला आहे. तसेच या साखरपुड्यात शाकाहारी मंडळींसाठी शाही भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. अनेक गोड पदार्थदेखील असणार आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम