अभिनेत्री प्रिया बापटने दिल्या जुन्या आठवणीना उजाळा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २८ मे २०२३ ।  सध्या ‘सिटी ऑफ ड्रिम्स’ या नव्या सिझनच्या प्रमोशनध्ये व्यस्त असेलली अभिनेत्री प्रिया बापट आहे. २६ मे रोजी ‘सिटी ऑफ ड्रिम्स’चा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रेम, राजकारण, नाती, हिंसा, शिव्या, डावपेच, सत्ता, महिला मुख्यमंत्री, बापलेकीचं नातं, मैत्री, आशा-निराशा अशा अनेक कांगोऱ्यांनी समृद्ध अशी ही वेबसिरिज आहे. पहिल्या दोन सिझनमधून आपल्याला पौर्णिमा गायकवाडचा राजकीय आणि वैयक्तिक प्रवास पाहायला मिळाला आहे. आता या तिसऱ्या आणि नव्या सिझनमध्ये पौर्णिमा गायकवाड मुख्यमंत्री होणार का? मग तिचा पुढील प्रवास कसा असेल? याची उत्तरं ही वेबसिरिज पाहिल्यावरच समजेल. प्रिया ही मराठी-हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती इन्टाग्रामवरही चांगलीच सक्रीय असते. ती आपले लेटेस्ट अपडेट्स हे सोशल मीडियावरून शेअर करते. यावेळी तिनं आपला एक असाच नॉस्टॅलिया व्हिडीओ हा सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की प्रिया सिद्धिविनायकच्या दर्शनला येते त्यानंतर ती आपल्या दादरच्या चाळीत पोहोचते.

तिनं हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय की, ”घर म्हणजे जिथे स्वप्ने फुलतात आणि मी माझ्या शहराची कायमच ऋणी आहे. या दादरच्या चाळीपासून (जेथे मी लहानाची मोठी झाले) ते जे प्रेम मला देशभरात आणि पलीकडेही मिळतं आहे. या जागेने मला सर्व काही दिले आहे आणि त्या सर्वांसाठी मी कृतज्ञ आहे!” यावेळी तिनं या व्हिडीओमध्ये आपल्या जुन्या चाळीबद्दल सांगताना आपल्या पहिल्या गणशोत्सवाच्याही आठवणी सांगितल्या आहेत.

प्रिया ही आपल्या फॅशन स्टाईलसाठीही ओळखली जाते. सोबतच प्रिया ही खूप फीट असते. ती कायमच इन्टाग्रामवरून आपलं फीटनेस अपडेटही चाहत्यांसोबत शेअर करत असते. त्यामुळे तिच्या चाहत्यांना तिचा फिटनेस पाहूनही प्रेरणा मिळते. प्रियाच्या टसिटी ऑफ ड्रीन्सटमधल्या लेसबियन सीनच्या बरीच चर्चा झाली होती. त्यावरून तो व्हिडीओ बराच व्हायरलही झाला होता. परंतु अनेक मुलाखतीतून प्रियानं यावर भाष्यही केले आहे. हा माझ्या कामाचाच एक भाग आहे. तेव्हा तो सीन का आहे हे पाहण्यासाठी संपुर्ण सिरिज पाहा आणि मग ठरवा असं म्हणत तिनं स्पष्टीकरण दिले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम