अभिनेत्री साराने सांगितला कंजूष असण्याचा तो किस्सा !
दै. बातमीदार । ३ जून २०२३ । नेहमीच सोशल मिडीयावर सक्रीय असलेल्या अभिनेत्री सारा अली खान सध्या ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला पहिल्याच दिवशी अत्यल्प प्रतिसाद मिळाला. मात्र आता साराच्या एका व्हिडिओची चांगलीच चर्चा रंगली आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री असून देखील साराला साधी जीवनशैली फॉलो करते. याचाच प्रत्यय तिच्या या व्हायरल व्हिडिओतून आला आहे.
दुबईमध्ये पार पाडलेल्या आयफा 2023 चा हा किस्सा आहे. यात ती सांगते की, “मी खूप जास्त कंजूष आहे. एका निर्मात्यानं मला सांगितलं की मोबाईल फोनमध्ये प्रवास करताना रोमिंग सुरू कर, परंतु हे याला मी नकार दिलाकारण अबूधाबीला ती फक्त एका दिवसासाठी आली होती. तुम्हाला विश्वास बसणार नाही परंतु त्यानं मला सकाळी सकाळी व्हॉट्सअपवर एक व्हॉइस मेसेज पाठवला की, रोमिंग 400 रूपयांना आहे, कृपया घेऊन टाक. मी तर माझा हॉटस्पॉटही माझ्या हेअर ड्रेसरकडून घेत होते. त्यामुळे मी त्याला रोमिंग पॅक अॅक्टिवेट करण्यास नकार दिला.”
विकी काैशल कपिल शर्माच्या शोमध्ये सारा अली खानची पोलखोल करतानाचा दिसला. यावेळी विकीने थेट सांगितले की, “सारा अली खान ही तिच्या आईलाही ओरडते. यावर सारा म्हणते की, माझ्या आईने 1600 रूपयांचा टाॅवेल खरेदी केला होता. इतका महागडा टाॅवेल कोणी खरेदी करते का? मी खूप जास्त मेहतनीने पैसे कमावते आणि खर्च करते,” असे यावेळी सारा म्हणाली.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम