अभिनेत्री सोनालीचे स्वप्न पूर्ण; फोटो केले व्हायरल !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १६ नोव्हेबर २०२२ मनोरंजन विश्वातील एक महत्वाचं नाव म्हणजे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हे होय. ती गेली काही दिवस सातत्याने चर्चेत आहे. लग्न असो, हनीमून असो किंवा वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी. ती कायमच चाहत्यांशी जोडली गेलेली असते. मध्यंतरी तिचा ‘तमाशा लाईव्ह’ चित्रपट येऊन गेला, तर लवकरच ती ‘महाराणी ताराराणी’ यांच्या चरित्रावर चित्रपट करणार आहे. आता तिने पुन्हा काही फोटो शेयर केले आहेत ज्यामध्ये ती आपल्या सासर -माहेर लोकांसोबत एकत्र दिसत आहे. विशेष म्हणजे ती कुटुंबासोबत भारत पाकिस्तान बॉर्डरवर गेली असून एका पोस्टच्या माध्यमातून तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सोनालीने एक स्वप्न उराशी बाळगलं होतं, ते म्हणजे तिला ‘अटारी’ म्हणजे भारत पाकिस्तान सीमेवरील ‘वागाह’ बॉर्डर येथे जायचं होतं, अखेर तिचे ही स्वप्न पूर्ण झाले असून आपल्या कुटुंबासोबत तिने ‘वागाह बॉर्डर’ला भेट दिली. तिथे घालवलेले काही रम्य क्षण तिने शेयर केले आहेत. यावेळी सोनालीसोबत पती कुणाल बेनोडेकर, तिचे सासू- सासरे, आई- वडील आणि भाऊ दिसत आहेत. संपूर्ण कुटुंबासोबत तिने अटारी सीमेला भेट दिली आहे. तर तिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये भारत पाकिस्तान सीमेवर होणाऱ्या लष्करी घडामोडी, वाजणारे देशभक्तीपर संगीत, प्रचंड गर्दी असे अंगावर काटा आणणारे वातावरण दिसत आहे. ही पोस्ट शेअर करत सोनालीने लिहिलं आहे, ‘अटारी/ वाघा बॉर्डर.. किती वर्षांची इच्छा आज पूर्ण झाली. इथला उत्साह पाहून खूप आनंद झाला. इथे देशभक्ती खऱ्या अर्थाने वाहते. प्रचंड उर्जा.. भावनांचा सागर.. हाय व्होल्टेज.. प्रचंड अभिमान. मी हे सगळं का लिहिलंय हे पाहण्यासाठी सोबत दिलेले फोटो पाहा.’ सोनालीची ही पोस्ट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोबतच अनेकांनी कमेंटही केल्या आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम