अभिनेत्री वर्षा उसगावकर पोहचली गोव्यातील घरी !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २७ सप्टेंबर २०२३ 

गेल्या काही वर्षाआधी मराठी चित्रपटाच्या दुनियेमध्ये अभिनेत्री वर्षा उसगावकर मोठ्या चर्चेत असत. आज देखील वेगवेगळ्या कारणाने नेहमीच चर्चेत येत असतात, सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरु असून तर कोकणात तर गणेशोत्सवाची वेगळीच धूम असते. पारंपारिक पद्धतीने इथे आजही हा उत्सव साजरा होतो.

मराठी अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनीही आपल्या गोव्यातील घराची झलक चाहत्यांना दाखवली आहे. तसंच अभिनेत्री गिरीज प्रभूचं त्यांनी आपल्या घरी स्वागत केलं त्याचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलाय.

वर्षा उसगांवकर या मराठीतील दिग्गज अभिनेत्री. त्यांनी आपल्या अभिनयाने ९० चा काळ गाजवला. गोव्यातील उसगाव हे त्यांचं मूळ गाव आहे. तिथे आजही त्यांचं घर आहे. आपल्या घराची झलक त्यांनी व्हिडिओ शेअर करत दाखवली आहे. घरासमोर तुळशी वृंदावन, लांब खोल्या, गणपती बाप्पाची मूर्ती असं प्रसन्न वातावरण दिसत आहे. अभिनेत्री गिरीजा प्रभूला त्यांनी आपल्या या घरी आमंत्रण दिलं होतं. वर्षा उसगांवकर यांनी गिरीजाचा हात धरुन तिला घराची सैर केली. तसंच गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. दोघींचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूपच आवडलाय.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम